बल्लारपुर (का.प्र.) - चंद्रपूर-मध्यप्रदेश येथे एका भाजपा आमदारा विरोधात लिखाण केल्याने स्थानिक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून पत्रकारांना अर्धनग्न करून पोलीस स्टेशन मध्ये मारहाण करण्यात येते त्यानंतर पत्रकारांची बदनामी व मुस्कटदाबी करण्यासाठी मारहाणीचे फोटो पोलिसांमार्फत सोशल मिङियावर प्रसारित केल्या जातात.... ही घटना लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाला काळिमा फासणारी असून,संबंधित भाजपा आमदारांचे त्वरित निलंबन करून संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली असून संपूर्ण देशात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,विदर्भ संघटक निलेश ठाकरे,विदर्भ कायदेशीर सल्लागार एड.राजेश सिंग,विदर्भ उपाध्यक्ष मिलिंद नारांजे पुरोगामी साहित्य संसदेच्या जिल्हाध्यक्ष एड.योगिता प्रकाश रायपुरे,चंद्रपूर जिल्हा प्रभारी तथा संपर्क प्रमुख सुजय वाघमारे यांनी दिला आहे.
पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून,पत्रकारांची गळचेपी करण्याचे षंढयंत्र भाजप आमदाराणी रचले असून, य पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून पत्रकारांना अर्धनग्न करुन मारहाण केलेली आहे.पत्रकारांशी असे कृत्य करणे आपल्या लोकशाहीला काळे फासणारे कृत्य असून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संपूर्ण देशपातळीवर अशा कृत्याचा निषेध नोंदवित असल्याची प्रतिक्रिया पुरोगामी पत्रकार संघ,पुरोगामी साहित्य संसदेने दिली आहे.व या संबंधीची तक्रार
मा. सुचणा एवम प्रसारण मंत्री,केद्र सरकार, दिल्ली मा.सुचणा व प्रसारण मंत्री,मंत्रालय, मुंबई यांच्या कडे सादर करण्यात आल्या आहेत.या संबंधाने ८ दिवसात संबंधित आमदार व पोलिसांवर कार्यवाही न झाल्यास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण भारत भर या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येईल,असा इशारा विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.