बहुचर्चित मुंडके नसलेल्या प्रेताचे रहस्य गुलदस्त्यातच...!
भद्रावती (सुनंदा खंडाळकर) - समाजात माणुसकी हरपल्याचे सर्वत्र बोलले जाते.परंतु हे खोटे ठरवत भद्रावतीने एका अनोळखी महिलेस न्याय मिळऊन देन्यासाठी महिलांचा सन्मान राखन्यासाठी रस्त्यावर उतरल्याने माणुसकीचे प्रत्यक्ष दर्शन भद्रावतीत पहायला मिळाले. दि.४ एप्रीलला भद्रावती शहरातील एका निर्जन जागेवर शासकीय ITI च्या समोर एका महिलेचे मुंडके नसलेले संपूर्ण नग्नावस्थेत असलेले एक प्रेत आढळुन आले. यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले तर संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे.
या घटनेचा निषेध करन्यासाठी महिलेचा पता लवकरात लवकर माहित करन्यासाठी,आरोपींचा शोध घेऊन त्यांना फासीची शिक्षा देन्यासाठी,घटनेची चौकशी C.I.D. मार्फत करन्यासाठी व गुन्ह्याचा खटला फास्टट्रैक कोर्टात चालविन्याच्या मागणीसाठी भद्रावती शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन निषेध मोर्चाचे आयोजन दि.६ एप्रीलला करन्यात आले होते. नागमंदीर पासुन हातात कँडल घेऊन सुरुवात झालेल्या मोर्चाचे मान. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ईथे निषेध सभेत मोर्चाची समाप्ति करन्यात आली. "महिलाओं के सम्मान मे भद्रावती मैदान मे, नारी शक्ति जिंदाबाद, हत्यारों को फाँसी दो फाँसी दो." अशा घोषणा यावेळी देन्यात आल्या.
सदर महिला कोन आहे? कुठली आहे? याचा पता अजुन लागला नसला तरी आमच्या शहरात ही घटना घडल्यामुळे गावचे नागरिक या नात्याने सदर महिलेस न्याय मिळवुन देने, हे आमचे कर्तव्य ठरते. अशी माणुसकीचे बोल सर्वत्र बोलल्या जात होते. सदर मोर्चा सौ.सुनिता खंडाळकर व सौ.वर्षा धानोरकर यांच्या पुढाकाराने काढन्यात आला व मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर यांनी केले. सुनिल रामटेके,संदिप जिवने,सौ.माया नारळे, नगरसेविका सौ.राखी रामटेके, कु.किरण विजय साळवी, सौ.पुष्पा चेट्टी,सौ.जयश्री कामडी, सौ.वर्षा पढाल,सौ.मंदा तराळे, सौ.तृप्ति हिरादेवे,सौ.प्रेमा पोटदुखे,सौ.रश्मि बिसेन, सौ.सुनिता अडबोल,सौ.विभा बेहेरे,सौ.किरण सातपुते, सौ.विश्रांति ऊराडे,फैयाज शेख, सिकंदर शेख ई.सहित अनेक महिला,नागरिक,युवक, विद्यार्थी,अनेक सामाजिक संस्था,राजकीय पक्षाचे प्रतिनिधि स्वयंस्फूर्तिने या मोर्चात सहभागी झाले होते.