बल्लारपुर (का.प्र.) - चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील ढोरवासा-पिपरी मार्गालगत शासकीय आयटीआय समोर विवस्त्र अवस्थेत एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आता त्या तरुणीची ओळख पटल्याचा दावा सूत्रांनी केला आहे या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेने ३ व्यक्तींना काल शुक्रवारी उशिरा ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे सदर तरुणीचे आई-वडील नातेवाईकांसह भद्रावतीत दाखल झाले आहे. ४ एप्रिल ला भद्रावतीत घटना उघडकीस आल्यापासून ४ दिवस लोटल्या नंतरही आरोपींचा सुगावा लागत नव्हता मात्र काल ५ व्या दिवशी त्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.या संदर्भातील अधिक माहितीनुसार सदर तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील मनसर येथील असल्याची सांगितले जात आहे. दुसरीकडे संशयाच्या आधारावर स्थानीक गुन्हे शाखेने ३ व्यक्तींना अटक केली असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळं सदर तरुणीची हत्या कुणी केली? कशासाठी केली? का केली? आरोपीनी हत्या करून सदर तरुणीचे शीर कुठे फेकले ? अशा विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्यास पोलिसांना मदत मिळेल विशेष म्हणजे या प्रकरणा संदर्भात पोलीस विभाग आज सर्व माहिती देण्यात येईल असे मत अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी दिली आहे.