संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर..!

अखेर त्या  शीर विरहित,निर्वस्त्र युवतीची ओळख पटली .. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलचे मोठे यश .. संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर .. त्या युवतीची आई वडील भद्रावतीत..

भद्रावती (ता.प्र.) - संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी 4 एप्रिल रोजी भद्रावती येथे झालेली घटना ही मानव जातीला कलंकित करणारी आहे. भद्रावती तेलवासा मार्गावर आयटीआय समोर शेत शिवारात एका 22 वर्षीय तरुणीचा  शीर नसलेला मृतदेह आढळल्याने जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र खळबळ उडालेली होती. घटनास्थळावरून प्राप्त पुराव्यांवरून सदर युवतीची हत्या झाल्याचे उघड झाले होते. मात्र हत्या झालेल्या युवतीची ओळख पटू नये म्हणून  त्या क्रूरकर्मा यांनी चक्क युवतीचे शीर कापून नेले होते. त्यामुळे पोलिसांसमोर या युवतीची ओळख पटवणे हे फार मोठे आव्हान होते. शीर कापून त्या युवतीला निर्वस्त्र करून तिचा मृतदेह भद्रावती परिसरात फेकून देण्यात आला होता. पोलीस स्टेशन भद्रावती येथे अज्ञात इसमाने विरुद्ध अपराध क्रमांक 141/2022 कलम 302, 201 भादवि चा गुन्हा नोंदविण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला. चार दिवसानंतर त्या तपासाला यश प्राप्त झाले असून पोलिसांना तरुणीशी ओळख पटवण्यात यश मिळाले आहे. पोलिसांना काही संशयित लोकांची माहिती प्राप्त झाल्याचे सूत्रांकडून कळले असून ते संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत हे विशेष. निर्गुण हत्या करून मयताची ओळख पटू नये म्हणून शीर कापून युवतीचा मृतदेह फेकून देऊन पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकण्याचा गुन्हेगारांनी केलेला प्रयत्न नियोजनबद्ध असल्याचे , तसेच गुन्हेगार सराईत असल्याचे असेही जाणवत होते . मात्र पोलिसांनी घटनेची माहिती कळताच चंद्रपूर पोलीस अधीक्षक रवींद्र साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेहा सह परिसराची पाहणी केली. हत्या करणाऱ्याने गुन्ह्याचे पुरावे, खुनाची निशाणी सोडली नसल्याने सदर मृत   तरुणीची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हा   शाखेतील सर्व अधिकारी व पथक तसेच सायबर सेल मधील सायबर एक्सपर्ट यांच्या मार्फतीने मृतदेह महिलेच्या शरीरावरील खुणा, मृतदेहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तू इत्यादी शोध पत्रिका तयार करून शोध घेण्यात आला. तसेच चंद्रपूर व आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमधून मागील काही दिवसात ह्या वयाच्या हरवलेल्या, पळून गेलेल्या मुलींच्या माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू होता. 

घटना घडून काही दिवस होऊनही कोणत्याही मुलीच्या हरवल्याची तक्रार प्राप्त झाली नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी तांत्रिक तपास केला .तसेच गोपनीय माहिती मिळवण्याचा अहोरात्र प्रयत्न केला. त्यामध्ये पोलिसांना यश आले. गोपनीय माहिती दाराकडून सदर महिलेची ओळख पटविण्यात आली. व तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला. त्यावरून तिच्या राहते घरचा रामटेक जिल्हा नागपूर येथील पत्ता प्राप्त झाला. त्यावरून तिची मोठी बहीण यांच्याशी संपर्क साधून ओळख पटविण्याची खात्री करण्यात आली. तिच्या बहिणीने तिच्या शरीरावरील  व्रन व वापरातील वस्तू पाहून हा मृतदेह   तिची बहीण असल्याची खात्री केली. स्वतंत्र राहत    असल्याने ती बेपत्ता असल्याचे अथवा तिच्यासोबत कुठलाही अप्रिय घटना घडली असल्याचा कुटुंबीयांना संशय आला नसल्याने पोलिसांना कुठलीही तक्रार देण्यात आली नाही असे कुटुंबीयांनी सांगितले. सदर आरोपी शोधण्याच्या स्थानिक गुन्हे शाखा तसेच भद्रावती पोलीस स्टेशन, सायबर सेलचे विविध पथक, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात तपास करीत आहे .याप्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून लवकरच आव्हानात्मक गुन्ह्यातील आरोपीवर पडदा पार होणार अशी माहिती आहे. सदर युतीचा एका ठिकाणी खून करीत त्याचे शीर कापण्यात आले. नंतर तिचा मृतदेह भद्रावती येथे आयटीआय परिसरात टाकून आरोपी पसार झाले अशी माहिती आहे. मयत मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्र साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे , जितेंद्र बोबडे, संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल सावळे व स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अंमलदार, सायबर सेल चे तज्ञ मुजावर आली ,वैभव पत्तीवार ,राहुल बोंद्रे ,भास्कर चिंचवडकर ,संतोष पानखडे ,उमेश रोडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.