राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा देशातील ज्येष्ठ नेते मा.श्री शरदचंद्र जी पवार यांच्या घरावरील षडयंत्रकारी भ्याड हल्ल्याचा बल्लारपूर येथे तीव्र निषेध ..!
बल्लारपूर (का.प्र.) - राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा देशातील ज्येष्ठ नेते मा.श्री शरद पवार जी यांच्या घरावरील षडयंत्रकारी भ्याड हल्ल्या च्या विरोधात बल्हारपुर येथे निषेध निदर्शने करण्यात आली. काल शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री शरदचंद्र पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन कर्त्यानी श्री मा.शरदचंद्र पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले होते. तसेच, कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटी देण्यासह त्यांच्यावर कारवाई न करण्याची सूचना एस टी महामंडळाला केली होती. पण, तरीही पुन्हा एस टी कर्मचारी आक्रमक झाले. शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचारी शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानात घुसले आणि घोषणाबाजी केली. हा न्यायालयाचा अवमान असून ज्येष्ठ नेते मा.श्री शरद पवार यांच्या विरोधातील षडयंत्र आहे. देशातील ज्येष्ठ व जनसेवेसाठी झटत आलेल्या नेत्याच्या घरावर असा भ्याड हल्ला करणे हे पुरोगामी व सामाजिक सुधारकांचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील ही अशोभनीय घटना असून अशा घटनांचा व षडयंत्रकारी प्रवृत्ती चा तीव्र निषेध बल्लारपूर येथे करण्यात करण्यात आला. व त्यांना अटक करा अशे निवेदन बल्लारपूर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. या वेळी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सूर्याभाऊ अडबाले, बल्लारपूर विधानसभा महिला अध्यक्ष शुभांगी साठे,बल्लारपूर शहर अध्यक्ष बादल उराडे, कार्याध्यक्ष इंजि.राकेश सोमानी, उपाध्यक्ष आरिफ खान,महासचिव संजय अग्रवाल, सचिव रवी बेज्जला,सचिव नितीन सोयाम,महिला शहर अध्यक्ष अर्चना बुटले, सचिव मलेश्वरी महेशकर, माया सातपुते, युवक अध्यक्ष रोहन जामगडे, या अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संकेत उपस्थित होते.