बल्लारपुर (का.प्र.) - जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणाठी कायमस्वरुपी खुला व्हावा या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कलाप्रेमीतर्फे सुरु असलेल या साखळी उपोषणाला मोठ्या प्रमाणात विविध मान्यवर संस्थेचा व जनतेचा पाठिंबा मिळत आहे. साखळी उपोषणाच्या आज रवीवार दि.३/०४/२०२२ रोजी ५० व्या दिवशी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक व जेष्ठ निर्माते - दिग्दर्शक श्री सतीश रणदिवे व श्री पितांबर काळे यांनी जयप्रभा स्टुडिओ येथे आपल्या चित्रीकरण केलेल्या जुन्या आठवणी सांगितले व हा स्टुडिओ लवकरच खुला व्हावा तसेच हा स्टुडिओ कोल्हापूर अस्मितेचा प्रश्न नसून मुबई पुणे येथील सर्व कलाकार मंडळीने या आंदोलन स्थळी भेट द्यावी यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष धनाजी यमकर,रणजित जाधव,सतीश बिडकर,मिलिंद अष्टेकर,राहुल राजशेखर,बाबा लाड,दिपक महामुनी,सुनील मुसळे,बबन बिरजे,राज पाटील श्रीकांत नरुले, राजीव पोळ,राहुल मोरे,निलेश जाधव,दादा पाटील,मंगेश मंगेशकर, सुदेश कुलकर्णी,सिद्धेश मंगेशकर तसेच रवींद्र बोरगावकर आदी मान्यवर कलाकार तंत्रज्ञ कामगार कलाप्रेमी उपस्थित होते.