बल्लारपुर (का.प्र.) - ठाणे येथील पर्यावरण दक्षता मंडळ आणि उत्तन (भाईंदर) येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या वतीने शुक्रवार दि. 8 एप्रिल ते रविवार दि.10 एप्रिल, 2022 प्रबोधिनीच्याच संकुलात पर्यावरण विषयक सृजनशील लिखाणाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रसिद्ध चरित्र लेखिका वीणाताई गवाणकर, डाॅ.गुरूदास नूलकर, डाॅ. प्रशांत धर्माधिकारी, श्री. मुकुल जोशी यांच्यासह इतर दिग्गज मान्यवर लेखकांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत मिळणार आहे. ही कार्यशाळा निवासी असून शुक्रवार-शनिवार पूर्ण दिवस आणि रविवारी अर्धा दिवस असेल. निवास व्यवस्था प्रबोधिनीच्या संकुलातच असेल.
प्रवेश मर्यादित. आता थोड्याच जागा शिल्लक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया या नंबरवर (8879169187) त्वरित संपर्क करावा.
Registration link -
https://forms.gle/UUTZNshHaQjcCN1c7