टेकडी विभागात मोक्षधामची व्यवस्था करण्याची मागणी..!

बल्लारपूर (का.प्र.) - बल्लारपूर येथे आशियातील सर्वात मोठा कागद कारखाना, कोळशाची खाण, वनविभागाचे डेपो आणि जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन असून, इतर शहरांच्या तुलनेत येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. येथे स्थायिक झालेल्या कुटुंबातील कोणत्याही मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण शहरात वर्धा नदीच्या काठावर केवळ एकमात्र मोक्षधाम आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता टेकडी परिसरात मोक्षधामची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून शहरातील रहिवाशांना त्यांच्या दिवंगत कुटुंबीयांवर अंत्यसंस्कार करणे सोपे जाईल. अशी मांगणी श्री संत गाडगेबाबा जनसेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, विकास राजुरकर ने वन विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री चंदनसिंह चंदेल व बल्लारपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनात केली आहे. निवेदनात श्रीनिवास सुंचुवार म्हणाले की, ज्या प्राण्याला जीवन मिळाले आहे त्याचा मृत्यू हे देखील शाश्वत सत्य आहे, जीवनानंतर मृत्यू हा अटळ असतो, मृत व्यक्तीच्या पार्थिवाचे प्रत्येक कुटुंब पूर्ण आदराने अंत्यसंस्कार करतात. शहराच्या विस्तार झाल्यामुळे स्थानिक टेकडी विभाग पासून मोक्षधामचे अंतर 4 ते 5 किमी आहे, त्यामुळे एवढ्या अंतरावर मृतदेह नेण्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: उन्हाळा आणि पावसाळ्यात मृतदेह लांबून नेण्यात मोठी गैरसोय होते. लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नगर पालिका प्रशासनाने स्थानिक टेकडी परिसरात मोक्षधामची व्यवस्था केल्यास सर्वांनाच सोयीस्कर होईल.

नगर पालिके चे मुख्याधिकारी विजय कुमार सारणाईक यांना निवेदन देण्यात आहे त्यावेळी मुख्याधिकारी यांनी सुद्धा या विषयावर गांभीर्याने काम करून वन विभागाच्या जागे साठी नगर पालिके तर्फे मंगणी करण्याचे आश्वासन दिले व तसेच दुसरी पर्यायी जागा मिळत असेल तर तेही प्रयत्न करून लवकरात लवकर या विषयावर काम करण्याची हमी दिली।

या पुर्वीही तत्कालीन बल्लारपूर नगरपालिकेच्या  मुख्यअधिकार्यांनी पत्र क्र. क्र. नपब/ यो. वि.672/07  दि. 2/6/2007 च्या माध्यमातून वनसंरक्षक, वहातुक व पणन विभागा यांना भूमि हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु ती मांगणी आज पर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मृतांच्या अंत्यसंस्कारात येणाऱ्या अडचणी पाहता टेकडी परिसरात तातडीने मोक्षधामची व्यवस्था करण्याची मागणी श्री संत गाडगेबाबा जनसेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार, विकास राजुरकर , प्रशांत भोरे, ज्ञानेन्द्र आर्य, वैभव मेनेवार यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.