बल्लारपूर (का.प्र.) -
बुध्द जयंतीच्या पर्वावर गौतमी महिला मंडळ संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजाला उद्देशून म्हणायचे की " आपल्या उत्पन्नाचा काही भाग समाजातील दिन दलित शोषित पीडित वंचित समाजाच्या सत्कार्यासाठी खर्च करावा ज्यामुळं समाजातील आपल्या बांधवाना सहकार्य लाभेल" याच जाणिवेतून बल्लारपूर शहरातील विद्यानगर वार्ड परिसरातील गौतमी महिला मंडळ, व पंचशील बहुजन युवा मंडळच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गोर-गरीब विद्यार्थ्यांसाठी उपयोगी येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालया च्या लोकार्पण सोहळ्याच आयोजन 20 मे 2022 ला कऱण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे सदर वास्तू ही समाजाच्या लोकवर्गणीतून तयार कऱण्यात आली आहे इतकंच नव्हे तर लहान बालकांनी सुध्दा आपल्या खाऊ चे पैसे यासाठी दान दिल्याचं वृत्त आहे. या निमित्ताने 20 मे 2022 ला सकाळी 8:00 वाजता पूज्य भन्ते आर्यसूत यांच्या वाणीतुन बुध्द पूजा होईल तदनंतर सकाळी 9:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन मा. उमेश पाटील, पोलिस निरीक्षक बल्लारपूर यांच्या हस्ते होईल तर प्रमुख पाहुणे म्हणुन मा. विजय देवळीकर, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, मा. जयवंत काटकर, उपमुख्याधिकारी, नगर परिषद बल्लारपूर, मा. इंजि. रोशन जांभुळकर, विदेशी भाषेत देश-विदेशात करियर मार्गदर्शक, नागपूर ई उपस्थित राहतील. दुपारी 12:30 वाजता डॉ. विजय कळसकर, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कऱण्यात आले आहे. सायंकाळी 5:00 वाजता विकास देशभ्रतार "कराटे प्रात्यक्षिक" सादर करणार आहेत. तर 5:30 वाजता प्रबोधन पर मार्गदर्शन होणार असुन या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक मा. प्रदीप अडकिने, अनिस मार्गदर्शक व वक्ता, मा.इंजि नेताजी भरणे, जिल्हाध्यक्ष, भारतीय बौध्द महासभा चंद्रपुर, मा. एड. भूपेन रायपुरे, संपादक अवेक इंडिया तथा संविधानाचे गाढे अभ्यासक ई ची उपस्थिती राहणार आहेत. रात्री 9:00 वाजता "मी रमाई बोलतेय " एकपात्री नाट्यप्रयोग सादरकर्त्या आयु. नंदाताई प्रविण मून करणार आहेत या एकदिवसीय कार्यक्रम दरम्यान गौतम कळसकर द्वारा संचालित काष्ठ शिल्प प्रदर्शनी तर विश्वास देशभ्रतार द्वारा संचालित जागतिक नाणे प्रदर्शनी च आयोजन कऱण्यात आलेलं आहे तरी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन गौतमी महिला मंडळ व पंचशील बहुजन युवा मंडळच्या वतीनं कऱण्यात आलेलं आहे.