बल्लारपुर (का.प्र.) - घर वास्तुशांती चा अनोखा उपक्रम श्री बंडु लोनगाडगे याच्या घराचा वास्तू करण्यात ठरविण्यात आले.त्यानुसार त्यांनी श्री स्वामी चैतन्य महाराज श्री क्षेत्र वढा चंद्रपुर यांचे प्रवचन ठेवण्यात आले.दि13-5-2022 ला बल्लारपुर नगरी मध्ये आगमन होताच सुभाष टॉकीज जवल चौकात भव्य पाद्यपूजा करून स्वागत करण्यात आले.श्री साई महिला भजन मंडल, बालाजी वार्ड, साई पुरूष भजन मंडल विवेकानंद वार्ड, दुर्गा महिला भजन मंडल विवेकानंद वार्ड, दत्त महिला भजन मंडल, डंभारे भजन मंडल इ.वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढली.स्वामी चैतन्य महाराज यांचे बालाजी मंदिर, साई मंदिर, अचानक प्रकट हनुमान मंदिर, गणेश मंदिर, व दत्त मंदिर इथे भव्य स्वागत करून आरती करण्यात आली.
त्यानंतर बंडू लोनगाडगे यांचे घरी भव्य स्वागत करण्यात आले.स्वागत श्री बंडू लोणगाडगे,वेदगिरी साहेब प्रबंधक बल्लारपुर कालॅरी,श्री पी.यू.जरीले,पटेल साहेब, किशोर मोहूर्ले,नगरसेवक जयश्री मोहूर्ले,श्री मोढे,राऊतभाऊ,गणपत राखूडे,तसेच सर्व महिला पुरूष मंडळींकडून भव्य स्वागत करण्यात आले.श्री बंडू लोणगाडगे,यानी चैतन्य महाराज यांचे जीवनावर परिचय दिला.श्री जरीले,मोढे,नगरसेविका जयश्री मोहूर्ले,अरुण वाघमारे,आप आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर गरिबांना तसेच भजन मंडळींना कपडे वस्त्र दान करण्यात आले.व त्यानंतर चैतन्य महाराज यांचे प्रवचन झाले.
महाराज यांनी जीवनात काय केले पाहिजे .सूखात ईश्वराचे नाव कमी घेतो व दुखात जास्त घेतो.स्वयंपाक करतानी महिलानी ईश्वराचे नामस्मरण करीत स्वयंपाक करून तो घरच्या मंडळीना खाऊ घातला तर घरी झगडे भाडंन चिडचिडा कमी होईल व सकारात्मक विचार करून घर आनंदमय राहील.प्रास्ताविक व संचालन किशोर मोहूर्ले यांनी केले नंतर सर्वांना महाप्रसाद वितरीत करण्यात आला.सौ.सिंधू लोणगाडगे पत्नी,मुलगा वैभव,सूनबाई सारीका,प्रभाकर गोहोकर यांचे अती मोलाचे सहकार्य मिळाले.