मुंबई (जगदीश काशिकर) - पोलीस दलातील काही ठराविक सनदी अधिकारी व इतर पदांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या वैयक्तिक फायद्याकरता चालविलेला मनमानी कारभार आणि त्याच अनुषंगाने केलेला भ्रष्टाचार त्याच संदर्भातील प्राप्त झालेल्या तक्रारी या संदर्भात पोलीस दलातील ठराविक सनदी अधिकारी किंवा त्यांनी नेमणूक केलेले चौकशी अधिकारी, प्राधिकरण, शासन अशा भ्रष्ट कारभारात लिप्त असलेल्या पोलीस दलातील लोकसेवकांच्याबाबत किंवा त्यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीबाबत सतत उदासीन असतात हे सत्य कोणी नाकारू शकत नाही.
आपल्याच खात्यातील भ्रष्टाचार करणारे लोकसेवक यांच्यावर योग्य कारवाई, अंकुश ठेवता येत नसेल, तर अशा वरिष्ठ पदावर बसण्यासाठी ते किती पात्र आहेत हे मोजमाप करण्याची गरज निर्माण झाली आहे, केवळ मानाचे पद मिळावे म्हणून राज्यातील, केंद्रातील राजकारणी राजकीय पक्षाचे नेते, मा. मंत्री महोदय यांच्या शिफारशी, राजकीय वरदहस्त येनकेन मार्गाने मिळवून पद मिळवल्यानंतर मात्र प्राप्त झालेल्या उच्चपदाच्या आसनावर बसल्यानंतर आम्ही कोणते योग्य काम करतो, जे काम मला कायद्याच्या चौकटीत राहून करावयाचे आहे आणि ते करणे मला बंधनकारक आहे याची जाणीव असतानासुद्धा केवळ आणि केवळ ज्याच्या राजकीय वरदहस्तामुळे मला हे मानाचे पद मिळाले त्यांच्या राजकीय आश्रयाला बळी पडून वाटेल तसे बेबंदशाही फतवे, अतिरंजित कारवाईचा बडगा उगारून पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करून, गटबाजीचे राजकारण करून अशा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा काटा कायमचा कसा काढायचा याचे सतत कटकारस्थान करत राहून भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात आणायचे, त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे जिणे मुश्किल करून टाकायचे! तो कसा आत्महत्येस प्रवृत्त होईल इतकी अमानवी कृत्य, मानसिकता खराब होईल इतक्या खालच्या पातळीत त्यांना त्रास देण्याची कोणतीही संधी सोडायची नाही, इतकी पातळयंत्री यंत्रणा तयार करून आपल्या भूमिका पार पाडत राहतो, हेच कार्य करत राहणे हीच यांची सदविवेकबुद्धी.
पोलीस दलातील अनेक समस्यांपैकी सर्वात भयंकर समस्या आहे, ती पोलीस दलातील काही ठराविक सनदी पोलीस अधिकारी, काही ठराविक इतर पदांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने चालणारी भ्रष्ट यंत्रणा (भ्रष्टाचार समस्या) आणि दुसरी अत्यंत भीषण गंभीर समस्या पोलीस दलातील सनदी अधिकारी, इतर विविध पदांवरील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या आत्महत्या या गंभीर समस्येवर उपाय योजना करण्यास आज शासनापासून पोलीस दलातील आजी-माजी कुटुंबप्रमुख यांनी कोणतीही योग्य ठोस उपाययोजना आखली नाही!
मात्र हे सर्व बेकायदेशीर कार्य कायद्याने चुकीचे आहे, मी वरीष्ठ पदावर असून पोलीस दलाचा कुटुंब प्रमुख या नात्याने मला वरीष्ठ ते कनिष्ठ या सर्वांना योग्य न्याय देण्याचे काम करणे गरजेचे असूनसुद्धा मी फक्त भ्रष्टाचारपूरक कामं करणारे ठराविक सनदी अधिकारी, इतर ठराविक पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्वमर्जीतील/राजकीय वरदहस्त असणाऱ्यांना वेगळे न्याय जे कायद्याने बेकायदेशीर आहेत, हे माहीत असूनसुद्धा सतत करत असतो. चौकशी अधिकारी यंत्रणा यांच्या मनमानी खोट्या रंगविलेल्या कागदपत्रे यांच्यावर दृढ विश्वास ठेऊन चुकीच्या कार्यपद्धतीने न्याय दानाचे काम करण्यात धन्यता मानत, आपल्याच कार्यकाळात दलातील भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला मूक संमतीने असंवेदनशील होऊन या सर्वांना जोमाने भ्रष्टाचार कारभार करण्याचे अलिखित अप्रत्यक्षपणाने लेखी आदेश देण्याचे अवैध काम करत असतो.
पोलीस दलातील अनेक समस्यांपैकी सर्वात भयंकर समस्या आहे, ती पोलीस दलातील काही ठराविक सनदी पोलीस अधिकारी, काही ठराविक इतर पदांवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने चालणारी भ्रष्ट यंत्रणा(भ्रष्टाचार समस्या) आणि दुसरी अत्यंत भीषण गंभीर समस्या पोलीस दलातील सनदी अधिकारी, इतर विविध पदांवरील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या आत्महत्या या गंभीर समस्येवर उपाय योजना करण्यास आज शासनापासून पोलीस दलातील आजी-माजी कुटुंबप्रमुख यांनी कोणतीही योग्य ठोस उपाययोजना आखली नाही! उदाहरणार्थ, शेतकरी राज्याच्या जीवावर भूमिहीन मजूर व त्यांचे कुटूंबीय अवलंबून असतात, त्यामुळे सदर मजुरांची क्षमता तर रोजची डाळ-भात, भाजी-भाकरी विकत घेऊन खाण्याइतपतसुद्धा नसते! या क्रय क्षमतेचा सरळ संबंधसुद्धा भ्रष्टाचार कारभाराशी आहे, कारण एक टक्का लोकांची वाढलेली संपत्ती आणि त्यात वाटा मिळवण्यासाठी या समाजातील नोकरशाही लोकसेवक ते राजकीय नेत्यांपर्यंत भ्रष्टाचार करण्यात चढाओढ लागलेली आहे. याचं वास्तव म्हणजे भ्रष्टाचार वाढीस लागला आहे, हे सत्य नजरेआड करून चालणार नाही.
दुःखदायी वेदनादायी गोष्ट हीच आहे, कि, “भ्रष्टाचार देशाच्या संपत्तीच्या त्या विभागणीमध्ये केला जातो, ज्यामध्ये सामान्यातील सामान्य, गरिबांतील गरीब माणसांची त्यात बरोबरीची हिस्सेदारी असते, आम्हाला आणि आमच्या शासनास, शासनातील शासकीय लोकसेवक मग ते कोणत्याही पदावरील असोत, मग ते मा. मुख्यमंत्री असोत किंवा भारताचे मा. पंतप्रधान असोत, सनदी अधिकारी ते अगदी कनिष्ठ पदांवरील सर्वच शासकीय विभागातील कार्यालये, येथील शासकीय लोकसेवक यांना एक प्रामाणिक प्रयत्न, विचार करायचा आहे की या गरीब माणसांच्या खरेदी करण्याच्या क्षमता कशा वाढतील ज्यांची ७० ते ७५% रक्कम फक्त १% लोकांच्या खिशात बेमालूमपणे जाते. आमच्या व्यवस्था निवडणुकीपूर्वी खूप घोषणा करतात हे ही सर्वश्रुत आहेच.”
देशाची आर्थिक घडी खिळखिळी करणारी सर्वात मोठी यंत्रणा ही भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या मुळेच होत आहे, हेही म्हणणे वावगे होणार नाही, म्हणूनच मी ज्या पोलीस दलात गेल्या ३५ वर्ष प्रामाणिकपणाने सेवा बजावत असताना याच विभागात ठराविक सनदी अधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी यांच्या भ्रष्टाचार कारभाराबाबत मा. मुख्यमंत्री ते भारताचे महामहिम मा. पंतप्रधान ते मुंबई पोलीस दलातील सन्माननीय आजी माजी मा. पोलीस आयुक्त ते मा. पोलीस महासंचालक यांच्याकडे दाद मागितली. पोलीस दलातील अशा भ्रष्टाचार करणाऱ्या ठराविक लोकसेवकांना योग्य समज द्या, हा भ्रष्टाचार थांबवा, यावर योग्य ठोस उपाय योजना करा, सर्वसामान्य जनतेची होणारी पिळवणूक थांबवा, परंतु हे सर्व अमान्य करून मी केलेल्या तक्रारीच्या बाबत वरील नमूद सर्व मान्यवरांनी खोट्या अहवालानुसार ते सादर करणाऱ्यांचे चुकीच्या कार्यपद्धतीचे समर्थन करून हा भ्रष्टाचार जाणीवपूर्वक नजरेआड करून पोलीस दलातील अशा भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या लोकसेवकांना पाठीशी घातले, कारण यात काही ठराविक वरिष्ठ सनदी अधिकारी सहभागी होते, कारण भ्रष्टाचार कारभारात पोलीस दलातील जे पोलीस अधिकारी/कर्मचारी सक्रिय होते ते सनदी अधिकारी यांच्या मनमर्जीतले होते आणि अशा भ्रष्टाचार करणाऱ्यांना वाचविणे म्हणजे तोही एक भ्रष्टाचारच आहे! त्यांचे हे बेकायदेशीर मनमानी कर्तृत्व म्हणजे त्यांनी स्वमर्जीने केलेली बौद्धिक दिवाळखोरी असून तो त्यांचा भ्रष्टाचार म्हणावा लागेल, या सर्व महोदयांच्या या गैरकारभाराचा मला अत्यंत वाईट अनुभव आला, येत आहे. यास्तव मी या भ्रष्टाचार प्रकरणांत इच्छा नसतानासुद्धा मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे सलग २ जनहित याचिका दाखल केल्यानंतरही माझ्या पोलीस दलातील भ्रष्टाचार तर कमी झाला नाही, पण मला मात्र यांच्याकडून सतत खोट्या प्रकरणात गुंतविणे, मानसिक त्रास इत्यादी अमानवी वागणूक देण्यात येत आहे. माझ्या सोबत होणारा हा एकतर्फी अमानवी अन्याय घडवण्यात येणारे षडयंत्र, वरिष्ठ अधिकारी यांची बेबंदशाही, चुकीची कार्यप्रणाली आणि या सर्व प्रकरणांत राजकीय वरदहस्त लाभलेले/असलेले सनदी अधिकारी जे करत आहेत ते सारेच अत्यंत दुर्दैवी आहेच आणि हे त्यांचे सर्वच मनमानी प्रकार कारभार उपहासाला पात्र आहेत. माझ्या पोलीस दलातील वरिष्ठ सनदी अधिकारी, माजी कुटुंबप्रमुख यांच्या निष्क्रियतेमुळे म्हणा! की राजकीय दबावामुळे किंवा वरिष्ठ सनदी अधिकारी यांच्या पक्षीय गट बाजीमुळे भ्रष्टाचार प्रकरणांत गुन्हा करून आम्ही सुटू शकतो, प्रामाणिक मा. कुटुंब प्रमुख, यांच्यावर किंवा आपल्यापेक्षा वरीष्ठ सनदी अधिकारी यांच्यावर राजकीय दबाब आणून काही सनदी अधिकारी त्यांना गप्प करू शकतात. या सर्व मनमानी कारभार प्रकरणांत यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांत, अन्यायाविरोधात याच यंत्रणेतील सर्व वरिष्ठ मुकदर्शक म्हणून वारंवार कसे रहातात वागतात, हेही न उलगडणारे कोडे झाले आहे. प्रत्येकवेळी अशा वरील गंभीर प्रकरणांत अन्यायकारक वागणूक मिळत असलेल्या कनिष्ठ पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी वारंवार सन्माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागण्याची परंपराच रुजवली जात आहे, पोलीस दलात जी यंत्रणा प्रत्येकवेळी मा. न्यायालयात जाण्यासाठी आपल्याच कार्यपद्धतीने आपल्याच विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना सल्ला देतात आणि बोलतात, आमचे कोण काय वाकडे करणार?
पोलीस दलातील मनमानी भ्रष्टाचार यावर प्रभावीपणाने उपाययोजना ज्या सनदी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची खरी जबाबदारी आहे तेच सर्व या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. ते असे का करत आहेत, याबाबत मी माझे विचार मांडले आहेतच, पण केवळ २/५ वर्षांच्या काळातील क्रीम पोस्टिंग करता आपल्या स्वाभिमानाची अंतर्मनात असलेल्या योग्य निर्णयाची अंमलबजावणी न करणे हेही अत्यंत दुर्दैवी आहे.
जी कारवाई पोलीस दलाने किंवा वरिष्ठ सनदी अधिकारी यांनी करणे अभिप्रेत असताना त्या पोलीस दलातील भ्रष्टाचार कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व सामान्यांनी सतत मा. न्यायालयात जात रहावे हे पुरोगामी महाराष्ट्र राज्यास वंदनीय की निंदनीय! पोलीस दलात राहून पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड करून जनहितार्थ स्वतःच्या आर्थिक परिस्थितीची कसरत/गंभीर आजारपण संभाळून मी मा. उच्च न्यायालयात २ याचिका दाखल करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहे. वास्तविक भारतातील उच्च विचारवंत, सेवाभावी संघटना भारताचे महामहिम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदींच्या सन २०१४च्या निवडणूक दरम्यान पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून सतत ज्या निवडणूक प्रचार सभा “ज्या वक्तव्याने त्यांनी गाजवल्या व ते मा. पंतप्रधानसुद्धा झाले. ती वक्तव्य अशी होती, भ्रष्टाचारमुक्त भारत देश मग मी त्यांच्या आव्हानाला ! संकल्पनेला साथ देऊन पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड केला त्याच पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील मा. मुख्यमंत्री, त्यांचे पारदर्शक कारभाराचे शासनाचे सन्माननीय खासदार, आमदार, मा. मंत्री महोदय दस्तुरखुद्द मा. पंतप्रधान साहेब, महाराष्ट्र राज्याची जनता, लोकसेवक, सनदी अधिकारी आणि माझे पोलीस दलातील सर्व पदांवरील सन्माननीय वरिष्ठ सनदी पोलीस अधिकारी इतर अधिकारी कर्मचारी यांना अभिमान असायला हवा, की नाही याचं गांभीर्य शासनास का नाही? आता मा. शासन व शासन कर्ते यांना पोलीस दलातील ठराविक सनदी अधिकारी व इतर पो. अधिकारी कर्मचारी यांच्याकडून होत असलेल्या मनमानी कारभार, भ्रष्टाचार कारभार करणाऱ्यांना वाचविण्याकरता ठराविक सनदी अधिकारी यांना राजकीय पाठींबा देऊन त्यांच्या बेकायदेशीर कामात मदत करणे किती आवश्यक गरजेचे आहे, याचे गांभीर्य कळत नाही, असे म्हणणे योग्य होणार नाही, जय हिंद!!
मान्यवर सर्व बंधू-भगिनी वरील माझे विचार मला पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड करताना आलेले असून त्याचा विपरीत परिणाम माझ्या संपूर्ण कुटूंबाला व मला भोगावा लागत आहे. यात कोणाची व्यक्तिशः किंवा व्यक्तीविषयी किंवा कोणत्याही पदावरील शासकीय सेवेतील अति वरिष्ठ अधिकारी, विभाग, शासन मा. मंत्री महोदय यांची बदनामी करण्यासाठी केले नाहीत, ही सर्व वस्तुस्थिती मी आजही अनुभवत आहे, जय हिंद!!
- सुनील भगवंतराव टोके - (सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुख्य नियंत्रण कक्ष, मा. पोलीस आयुक्त मुंबई पोलीस दल)
सद्या मी निलंबित आहे याच कारणास्तव 20 जानेवारी 2022 पासून भ्रष्टाचार उघड करतो व पोलीस दलाची बदनामी करतो हे कारण देऊन !!