महिला आरोग्य शिबीर संपन्न..!

 

भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक साईप्रकाश कला अकादमी, भद्रावती व विमला देवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वांढरी, जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29/5/ 2022 रोज रविवार ला हुतात्मा स्मारक भद्रावती येथे ' बालकुमार  फन अँड लर्न ' या उन्हाळी शिबिराचे औचित्य साधून महिला आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक व चिकिस्तक प्रा. डॉ.ज्योती वरठी - मालवी ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट  उल्काताई पद्मावार, मा. अल्काताई वाटेकर व मा.श्रीया भालेराव ह्या होत्या.कार्यक्रमाकरिता दहा वर्षा वरील मुली माता व किशोरवईन मुलांना देखील सहभागी करण्यात आले एडवोकेट उल्काताई पदमावर यांनी पालक व मुलांना पास्को कायदा तसेच या वयात इतरांन कडून केले जाणारे योग्य अयोग्य स्पर्श, मुला मुलींशी मातांचा सु संवाद या वयातील मुलांच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी, त्यांच्यावर योग्य निगराणी कशी ठेवावी यावर अतिशय मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले. याशिवाय किशोर वयात मुलीनं मध्ये होणारे शारिरिक, भावनिक बदल या विषयी मुलांना देखील उघड शब्दात मार्गदर्शन केले.डॉ. ज्योती वरठी यांनी महिलांच्या शारीरिक समस्या त्यावर योगा द्वारा उपचार प्रात्यक्षिका द्वारे करून दाखविले. गर्भाशशयाचे आजार, कर्क रोग, अनियमित व अकाली येणारे मासिक धर्म या रोगाला कारणीभूत फास्ट फूड, जंक फूड, वेळी अवेळी खानपानाच्या सवयी, अयोग्य आहार यावर उत्तम अशे मार्गदर्शन केले.शरीरावर विविध आजार व दुखापतीच्या आठ शत्रक्रिया होऊन देखील नियमित योगा मुळे आपण आजही तरुणाई सारखी स्पुर्ती घेऊन सामान्य जीवन व्यथित करीत असल्याचा स्वानुभव सांगत मा.अल्काताई वाटेकर यांनी महिला आरोग्या करीता योगा किती  महत्वाचा आहे ते व्यक्त केले.मा श्रेया भालेराव यांनी विविध उदाहरण व अनुभवातील गोष्टी सांगून उत्तम अशे मार्गदर्शन केले.मुली व महिला पालकांनी आपापल्या विविध शारीरिक आरोग्य समस्यांचे डॉक्टरांन कडून निराकरण करून घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री क्षितिज शिवरकर यांनी केले व आभार कुमारी प्रणाली पिंपळकर हिने केले. कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी आर्या आंबाडे, सांची गणवीर, श्री विनोद ठमके, श्री शालिक दानव व संपूर्ण विध्यार्थी यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाला किशोरवईन मुले व माता भगिनीं उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.