भद्रावती (ता.प्र.) - उन्हाळ्याच्या दिवसात रक्तपेढीत रक्ताची टंचाई असते.त्यामुळे ती टंचाई दूर व्हावी रक्ताचा पूरवठा सुरळीत राहावा या दृष्टिकोनातून व जिल्हा रक्तसंक्रम अधिकारी अनंत हजारे सर यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत चंदनखेडा परिसरातील .. युवकांनी मंगळवारी बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट व शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदान केले.या शिबिराला सकाळ पासूनच गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत होती. परिसरातील युवक, व्यापारी, यांनी रक्तदान केले.भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील गुरुदेव सेवा मंडळ येथे बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट व शौर्य क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ आणि आदिवासी समाज संघटन तथा ग्रामवासीयांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर नुकतेच आज दिनांक ३१ मे २०२२ मंगळवार ला पार पडले यावेळी परिसरातील अनेकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान केले.शिबीराच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नागोराव ठावरी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल जी हनवते, ग्रामपंचायत सदस्य बंडुजी निखाते, पाटोळे, बोबडे, सोनुले, पंकज पवार,(समाजसेवा अधिक्षक),कोल्हे विभाग प्रमुख रक्तक्रेंद्र ,जय पचारे रक्तक्रेंद्र वैज्ञानिक अधिकारी, निखिल गांधी सहायक ,अभिलास कुकडे,आदि उपस्थित होते. समाजपरिवर्तक गणेश ऊर्फ बिरसा हनवते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक समाजपरिवर्तक गणेश हनवते यांनी व संचालन अमित नन्नावरे तर आभार शुभम भोस्कर यांनी मानले या शिबिरास गावातील युवक वर्गानी स्वयंप्रेरणेने महत्वपूर्ण सहकार्य केले.