"निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके - सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे, विभागाचे वाभाडे, गैरप्रकार व व्यक्तिगत केली आपली व्यथा, तक्रार" ..
मुंबई - श्रीमती मंदा ताई यांनी आवाज उठवला तर मीडियात जोरदार चर्चा का? तर त्या आमदार लोक प्रतिनिधी आहेत, फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून मग मी यांच्या अगोदर मे उच्च न्यायालयात याच कारणास्तव भ्रष्टाचार प्रकरणांत स्वखर्चाने मे उच्च न्यायालय मुंबई येथे स्वखर्चाने याचिका दाखल केल्यावर हेच विरोधी पक्ष नेते व लोकप्रतिनिधी आमदार आणि इलेट्रॉनिक व प्रिंट मीडिया मूग गिळून का गप्प आहेत. यांना ही याचिका मे उच्च न्यायालय मुंबई येथे जनहितार्थ करण्यास कोणती बाधा आहे. मी पोलीस दलातील भ्रष्टाचार करणारांच्या विरोधात आवाज उठवतो तक्रारी करतो. मे उच्च न्यायालय मुंबई येथे जनहितार्थ याचिका दाखल करतो, कशा करता? तर पोलीस दलाची बदनामी व प्रतिमा या भ्रष्टाचार करणाऱ्या काही ठराविक सनदी अधिकारी व त्यांचे राजकारणी लोकप्रतिनिधी, विविध पदांवरील मपोसे पदांवरील पोलीस अधिकारी यांच्या मुळे होते की माझ्या आवाज उठवण्याने, तक्रार केल्याने तद्नंतर ही यांनी योग्य कारवाई केली नाही तर मा न्यायालयात याचिका दाखल केल्याने होते हा माझा रोख ठोक सवाल या व्यवस्थेतील प्रामाणिक इमानदार लोकप्रतिनिधी, शासकीय सेवेत असणाऱ्या व भ्रष्टाचार करणाऱ्या सनदी अधिकारी व त्यांच्या भ्रष्टाचार करणाऱ्या टोळी तील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना पोलीस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्या ठराविक सनदी अधिकारी व इतर पदांवरील अधिकारी कर्मचारी यांना याच महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळातील प्रत्येक पक्षातील पक्ष प्रमुख, मा. मंत्री, मा. आमदार मा. खासदार यांचा पाठींबा असल्या शिवाय हे भ्रष्टाचार करणारे इतके मुजोर व बेकायदेशीर कामात कदापी सक्रिय राहणार नाही आणि हे मी सांगण्या पेक्षा अधिवेशन काळात जे काही तारांकित प्रश्न पोलीस दलातील भ्रष्टाचार व मनमानी कारभार करणाऱ्यांच्या विरोधात उभे राहिले ते समस्त महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेने पाहिले व ऐकले आहे. इथं सोयीनुसार राजकारण करून प्रत्येक राजकीय पक्ष मग ते सद्या सत्तेत असणारे व गत काळातील त्या सर्व मा मंत्री मंडळ व पक्ष प्रमुख यांनी स्वतःच्या गुन्हेगारीचा भ्रष्टाचार कारभाराचे वाभाडे कोणी काढू नये या करता पोलीस दलातील काही ठरावीक सनदी अधिकारी,सर्वच पदांवरील आणि मपोसे पदांवरील पोलीस अधिकारी यांना आपल्या वळचणीला बांधण्याचे बेकायदेशीर काम करून बदली नियमाना हरताळ फासून एक स्वतंत्र पोलीस यंत्रणाच स्वतःच्या गरजेनुसार उभी केलेली आहे हे मी सांगण्याची नक्कीच गरज नाही. यांच्या या बेकायदेशीर नंगा नाचाचे बेकायदेशीर भ्रष्टाचार कारभाराचे यांच्या चुकाच्या कामाचे कोणी गारुड वाजवण्याचे सुरू केले की तो राष्ट्र द्रोही ठरवला जातो, त्याला मारले जाते, त्याच्यावर खोटे गुन्हे राजकीय दबावापोटी दाखल केले जातात, मोर्चे आयोजित केले जातात, मुंडन केले जाते, डोळे फोडले जातात, पोलीस सौरक्षणात मंत्री महोदय स्वतःच्या बंगल्यावर नेऊन मरेपर्यंत अमानुष मारहाण केली जाते ही आहे इथली लोकशाही जो यांच्या भ्रष्टाचार, मनमानी बेकायदेशीर कारवाई बाबत आवाज उठवणार त्याचा मुंबई पोलीस दलातील सुनील भगवंतराव टोके केला जाईल अशी व्यवस्था उभी करून दुसरा कोणी सुनील टोके पोलीस दलात नव्याने पैदा होऊच नये अशी बेकायदेशीर अप्रशासकीय दहशत निर्माण करून या पोलीस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना साथ देणारी राजकीय यंत्रणा यांचा निषेध करावा की यांच्या या पोलीस दलात भ्रष्टाचार वट वृक्षाला उंच उंच गगनाला नेण्यासाठी यांच्या पाठींब्याच कौतुक करावं हेच समजत नाही ज्यांनी खाकी वर्दी परिधान करताना आणि ज्या लोकप्रतिनिधी यांनी खादी परिधान करून मंत्री पदाच्या शपथा घेतल्या त्यांना त्या शपथ पत्रातील ऐका ही शब्दाची आठवण गोरगरीब जनतेच्या Tax च्या पैशांवर व भ्रष्टाचार करून स्वतः चा उदरनिर्वाह करताना गोरगरीब जनतेवर अन्याय करताना आठवत नाही हे पुरोगामी महाराष्ट्र राज्याचे अभाग्य आहे की भाग्य हेच समजत नाही. भ्रष्टाचार मुक्त पोलीस दल व्हावं हीच अशा बाळगतो हे सर्व व्यक्त होताना वाईट नक्कीच वाटत आहे यातून कोणाची वयक्तिक बदनामी करण्याचा माझा हेतू नाही पण हे व्यक्त होण्यासाठी मला मजबूर करणारी ही सर्व यंत्रणा जबाबदार नक्कीच आहे नाहीतर सचिन वाझे काझी, शर्मा माझ्या राज्याचे मा गृह मंत्री, इत्यादी आज तुरूंगात नसते. जय हिंद !! सुनील भगवंतराव टोके, मुंबई पोलीस. सद्या मी निलंबित आहे याच कारणास्तव 20 जानेवारी 2022 पासून भ्रष्टाचार उघड करतो व पोलीस दलाची बदनामी करतो हे कारण देऊन.
- जगदीश का. काशिकर - कायदा (लॉ), सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र - ९७६८४२५७५७