भद्रावती (ता.प्र.) - गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला," शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर श्री मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक भद्रावती तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रपूर श्री नंदुभाऊ पढाल यांच्या नेतृत्वात भद्रावती शिवसेना शहर कार्यलय मध्ये दिनांक १९ जून २०२२ ला सायंकाळी ७.०० वाजता शिवसेनेचा ५६ वा वर्धापण दिन साजरा करण्यात आला. तसेच शिवसेना वर्धापण दिनानिम्मित अनु राजेश लांबट, आर्यन शंकर मिरे, ओम अशोक उरकांडे अश्या दहावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना सदैव समाज कार्य करीत असून सर्वच विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून त्यांचे मनोबल वाढविण्याचे तसेच मदत करण्याचे कार्य करीत असते असे नंदू भाऊ पढाल यांनी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख बाळाभाऊ क्षीरसागर,शिवसेना नगरसेवक राजूभाऊ सारंगंधर,युवासेना तालुका सनमवयक घनश्यामभाऊ आस्वलें, युवा सेना शहर सनमवयक गौरव नागपुरे,माजी युवासेना तालुका प्रमुख येशूभाऊ आरगी,सतीशभाऊ आत्राम,राहुलभाऊ खोडे राजेशभाऊ लांबट, शंकरभाऊ मिरे,समस्त पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.