शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..

भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सकाळी सहा वाजता योग दिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात योग दिन संपन्न करण्यात आला.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक रमेश चव्हाण यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवत उपस्थितांनी त्याप्रमाणे योगासनांचा अभ्यास केला.

यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे सर यांनी "करो योग , रहो निरोग " या विषयावर मार्गदर्शन केले .मानवी जीवनात निरोगी राहून रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल, तर दैनंदिन  जीवनात योग अभ्यास केलाच पाहिजे असे मार्गदर्शन केले.या प्रसंगी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , प्राध्यापक डॉ. ज्ञानेश हटवार, रमेश चव्हाण, हरिहर मोहरकर ,किशोर ढोक ,नरेश जांभूळकर, भिष्माचार्य बोरकुटे,अनंता चौधरी ,किशोर चौधरी ,अनिल मांदाडे , सतिश नंदनवार , मेघश्याम ठिकरे, अशोक पीदूरकर  तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दैनंदिन जिवनात योगाभ्यास करण्याचा सगळ्यांनी संकल्प केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ज्ञानेश हटवार यांनी केले .कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक किशोर ढोक यांनी केले ,तर आभार प्रदर्शन प्राध्यापक नरेश जांभूळकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.