बल्लारपुर (का.प्र.) - चंद्रपूर तालुक्यातील वरवट,चोरगाव,निंबाळा इत्यादी गावातील वनजमिनिवरील अतिक्रमण धारकांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील ४-५ दिवसांपासून ऐन शेतीच्या हंगामाच्या वेळी शेतकऱ्यांना त्रास देणं सुरू केल्याबाबत मा.जिल्हाधिकारी श्री.अजय गुल्हाने यांना या गावांचे सरपंच नागरिक या सर्वांनी एक तक्रार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य यांच्या नेतृत्वात दिली. मा.जिल्हाधिकारी साहेबांनी तत्काळ तहसीलदार चंद्रपूर यांना मोका चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार चंद्रपूर यांनी वरवट,चोरगाव या गावांना प्रत्यक्ष भेट देवून वनअधिकारी आणि गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपला अहवाल मा.जिल्हाधिकाऱ्यांना सदर केला. १० जून रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या दालनात मा.जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वन विभागाचे अधिकारी श्री.गुरुप्रसाद,तहसीलदार श्री.निलेश गौड,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य,वरवटच्या सरपंच,श्री.जुमडे,माजी पं.समिती सदस्य दिगंबर दुर्योधन,निखिल दुर्योधन व प्रमुख गावकरी यांच्या उपस्थितीत एक बैठक संपन्न झाली.या बैठकीत यंदाच्या शेती हंगामापुरती अतिक्रमण मोहीम थांबविण्याचा निर्णय झाला.
जिल्हा राष्ट्रवादीच्या मध्यस्थीने वनजमिनिवरील अतिक्रमण धारकांना मिळाला दिलासा !