विसापूर येथील रेल्‍वे प्‍लॅटफार्मवर पादचारी पुलाचे बांधकाम करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर येथील रेल्‍वे प्‍लॅटफार्मवर पादचारी पुलाचे बांधकाम करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी..!

बल्लारपुर (का.प्र.) - बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर येथील रेल्‍वे प्‍लॅटफार्मवर पादचारी पुलाचे बांधकाम करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्‍वेमंत्री अश्विनी वैष्‍णव आणि रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे यांच्‍याकडे केली आहे. बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर हे चंद्रपूर जिल्‍हयातील महत्‍वाचे व मोठे ग्राम पंचायत क्षेत्र आहे. याठिकाणी रेल्‍वे थांबा व रेल्‍वे प्‍लॅटफार्म उपलब्‍ध असून त्‍याठिकाणी पादचारी पुलाची नितांत आवश्‍यकता आहे. या स्‍टेशनवर बल्‍लारपूर-वर्धा, वर्धा-बल्‍लारपूर, काजीपेठ-नागपूर, नागपूर-काजीपेठ, गोंदिया-बल्‍लारपूर-गोंदिया या रेल्‍वे गाडयांचा थांबा आहे. तिस-या व चौथ्‍या प्‍लॅटफार्मवर जाण्‍यासाठी रेल्‍वेलाईन ओलांडून जावे लागते. विशेष म्‍हणजे रेल्‍वेलाईन व रेल्‍वे स्‍टेशन गावाच्‍या मध्‍यभागी आहे. त्‍यामुळे नागरिकांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्‍यामुळे या ठिकाणी पादचारी पुलाचे बांधकाम करणे प्रवाश्‍यांच्‍या सोईच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत गरजेचे आहे, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्‍वेमंत्री व रेल्‍वे राज्‍यमंत्री तसेच रेल्‍वे प्रशासनाला पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे. लवकरच रेल्‍वे बोर्डाचे सदस्‍य या भागात पाहणी दौ-यासाठी येणार असून सदर बाब त्‍यांच्‍या निदर्शनास आणली जाईल, असेही आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.