बल्लारशाह किल्याचे नुकसान झाले तर नगर परीषद जवाबदार - पराग गुंडेवार

या पावसाळ्यात बल्लारशाह किल्याचे नुकसान झाले तर नगर परीषद जवाबदार - पराग गुंडेवार

बल्लारपुर (का.प्र.) - बल्लारशाह किल्याच्या व बल्लाळशाह राजे यांच्या समाधी स्थळाच्या संवरक्षन,पुणर्वसन आणी सौदर्यकरणा साठी इमेल व्दारे पराग गुंडेवार यांनी नगरपरीषद ला निवेदन दिले आहे, पराग गुंडेवार‌ यांनी बोलतांना सांगीतले कि, न.प.च्या नव्या मुख्याधीकार्यांना अध्याप भेट दिली नाही सदर‌ निवेदन भेटुणच देणार होतो मात्र आपन बल्लारशाहत उपस्थीत नसल्याने सदर निवेदण इमेल‌ व्दारे पाठवीले आहे. सदर‌ निवेदनात म्हनटले आहे कि,पहीली राजधानी शिरपुर तर दक्षीन गोंडवानाची दुसरी राजधानी ही बल्लारशाह शहरात आहे,विश्वपराक्रमी महाराजा खांडक्या बल्लाळशाह राजे यांचा राजधानीचा कील्ला असेला बल्लारशाह कील्याचा मागच्या वर्षी पावसा मुळे बुरुज ठासळला होता, यात ऐतीहासीक कील्या सह शेजारच्या घराचे ही नुकसान झाले होते,सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही, पुरातन खात्याकळे या कील्लाची व विश्वपराक्रमी महाराजा खांडक्या बल्लाळशाह राजे यांच्या समाधी स्थळाची नोंद नाही आहे ही शोकांतीका. पुरातन विभागाने आम्हाला माहीती अधीकारत हे स्पष्ट केले आहे  किल्लाची व समाधी स्थळाची जवाबदारी नगर परीषद बल्लारशाह ची आहे, बल्लारशाह नगर परीषद ला २कोटी  नीधी येऊन ही किल्याचे विषेश काम अध्यापही झाले नाही,किल्ल्याचा बुरुजाला संवरक्षन भींत बांधली नाही,कील्लाच्या पुणर्वसनासाठी सौदर्यकरणा साठी योग्य ती हालचाल नाही, वर्ष निघुन गेला परत पावसाळ्याला सुरवात झाली आहे दरवर्षी पेक्षा जास्त या वर्षी अतीवृष्टीची संभावना हवामान खात्याने दर्शवीली आहे. मात्र तरीही स्थानीक प्रशासना कडुण योग्य उपाय योजना होतांना दिसून येत नसुन कील्याची व‌ समाधी स्थळाची परीस्थिती बिकट होत चाली आहे. बल्लारशाह शहराला ऐतीहासीक वारसा लाभला आहे, तो वारसा टीकवीन्या साठी प्रशासन‌ योग्य ती वाटचाल‌ करतांना दिसत नाही. जर का या पावसाळ्यात कील्ला व समाधी स्थळाचे काही नुकसान झाले तर त्याला सर्वस्वी जवाबदार स्थानीक प्रशासन व बल्लारशाह विधानसभेचे विदमान आमदार अस्तील असे या निवेदनात पराग गुंडेवार‌ यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.