पिपरी देशमुख वर्धा नदी घाटावर पाण्यात बुडून इसमाचा मृत्यु..!
भद्रावती (ता.प्र.) - पिपरी देशमुख येथे अस्थी विसर्जनासाठी आलेले डोलारा चंडिका वार्ड भद्रावती येथील दिलीप मारोती रणदिवे वय 50 वर्षे याचा खोल पाण्यात बुडून म्रुत्यु झाला.सदर म्रुत्यु ची बातमी नगरसेवक राहुल सोनटक्के यांनी पोलीस ठाण्यात दिली. व चंद्रपूर येथील रेस्क्यू पथकयांनी म्रुतकाला बाहेर काढले.पोलीस काँ.मनोहर नांदे व पोलीस बेझलवार ,पोलीस पाटील सुनिता ठोंबरे यांनी पंचनामा केला. बोटचालक,अशोक गारगेलवार,दिलीप चव्हाण, अतुल चहारे,उमेश बनकर, मंगेश मते, वामन नक्षीणे,सुजीत मोगरे, गीरीश मरापे,अजीत बाटे.यांनी सहकार्य केले.