भद्रावती (ता.प्र.) - मार्च दोन हजार बावीस ला उच्च माध्यमिक परीक्षा घेण्यात आली. सगळ्यांना या परीक्षेबद्दल निकाल केव्हा लागणार ही उत्सुकता कायम होती ती प्रतीक्षा आता संपली उद्या दिनांक आठ जून 2022 ला दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 8 जुन दोन हजार बावीस ला दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी अधिकृत घोषणा केली आहे सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने उद्या पाहता येणार या निकालामुळे पुढील प्रवेशाचा विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.
अधिकृत संकेतस्थळ -
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
https://mahresults.org.in
https://lokmat.news18.com
https://www.indiatoday.in/education-today/results
https://mh12.abpmajha.com
https://www.tv9marathi.com/board-result-resgistration-for-result-marksheet-12th
या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!