मुम्बई (जगदीश काशिकर) - गेल्यावर्षी दुर्घटनेनंतर साक्षीला मुंबईतील के ई एम रुग्णालयात साक्षीवर उपचार करण्यात आले. यावेळी रुग्णालयात समक्ष भेट देऊन श्री शिंदे यांनी साक्षीच्या उपचारासाठी 5 लक्ष रुपयांची थेट आर्थिक मदत केली होती. यावेळी श्री शिंदे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानवर आधारित कृत्रिम पाय बसविण्याच्या डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते साक्षी दाभेकर हिला अत्याधुनिक कृत्रिम पाय बसविण्यात आला. यावेळी साक्षी च्या चेहऱ्यावर एकच स्मित हास्य उमटले. डॉ.अंकुश सेठ यांच्या टीमने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अत्याधुनिक कृत्रिम पाय साक्षीला बसविण्यात आला. २ वर्षाच्या बाळाला वाचविण्याऱ्या साक्षीच्या धाडसी कामगिरी अतुलनीय ; राष्ट्रपती बाल शोर्य पुरस्कारासाठी दिल्लीत पाठपुरावा करणार - मा.खा.डॉ.श्रीकांत शिंदे !!
"साक्षीचे धाडसी कार्य, - पूरस्थितीत पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात एका दोन महिन्याच्या मुलाला वाचवताना भिंत अंगावर कोसळून साक्षी दाभेकर (वय १४) ही क्रीडापटू जबर जखमी झाली होती. तिला तातडीने मुंबईत हलवण्यात आले. 'केईएम' मध्ये डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला होता. या मुलीची घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असल्याने पुढील उपचाराच्या लाखो रुपयांच्या खर्चाचा प्रश्न उभा राहिला होता. त्याअनुसरून नगरविकास मंत्री मा ना एकनाथजी शिंदे यांनी डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हि जबाबदारी उचलली. साक्षीचे ऑलम्पिक मध्ये धावण्याचे स्वप्न असून या स्वप्नपूर्तीसाठी श्रीकांत शिंदे फाऊंडेशन सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.