बल्लारपुर (का.प्र.) - दिनांक ०५ जून रविवार रोजी, बामणी व विसापूर पंचायत समिती निवडणूकी च्या संबंधात बैठक बल्लारपूर तालुक्यातील बामणी गावात एक तास राष्ट्रवादी साठी या प्रांताध्यक्ष आद.ना.जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून बामणी येथे ग्राम पंचायत सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व गावकऱ्यांची चावडी बैठक जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत महिला जिल्हाध्यक्ष सौ. बेबीताई उईके, तालुका अध्यक्ष महादेव देवतळे, शहर अध्यक्ष बादल उराडे, कार्याध्यक्ष राकेश सोमानी,उपाध्यक्ष आरिफ खान,राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुहास बहादे, महिला विधानसभा अध्यक्ष शुभांगी साठे, सुमित डोहणे, अंकीत निवलकर,ग्रामीण सचिव इम्रान खाण, विनोद गोंधळी, संजय बावणे, कार्तिक चौहान, वामन सोनवणे,यांनी या बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत बामणी गावाची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली.
बामणी गावचे अध्यक्ष म्हणून सुखदेव भोयर,अतुल गेडाम तालुका महासचिव, दीक्षित इंगळे तालुका सचिव,कुणाल शेरखी तालुका सचिव,यांची नियुक्ती करण्यात आली. येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने बामणी गावातील वार्ड निहाय संघटन बांधली आणि बामनीच्या विविध समस्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.