काँग्रेस सांस्कृतिक कार्य सेलच्या प्रदेश सचिव पदी कलावंत रफिक कुरेशी यांची निवड..!

मेहकर (चंडिका एक्सप्रेस) - मेहकर येथील सिनेअभिनेते तथा पत्रकार रफिक कुरेशी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक कार्य सेल चित्रपट, रंगभूमी, संगीत ,नाट्य विभागाच्या प्रदेश संघटक सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक कार्य सेलचे अध्यक्ष अशोक झगडे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मुख्य संघटक महाराष्ट्र मुख्य समन्वयक व प्रशासन एडवोकेट मनिष व्हटकर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे रफिक कुरेशी हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून चित्रपट क्षेत्रात कार्य करीत असून त्यांनी शेतकरी पुत्र" हीच बायको पाहिजे" अशी नको सुनबाई" हक ए सैलानी" सुलताने महाराष्ट्र" चिमण्या" जीगरा एक संघर्ष आदी अनेक चित्रपटात मुख्य भूमिका केलेले आहेत रफिक कुरेशी यांची प्रदेश संघटक सचिव पदी निवड झाल्याने प्रदेश महिला उपाध्यक्ष शोभाताई मोरे नामवंत दिग्दर्शक व निर्माता आनंद शिंदे उर्फ बाबा अनेक कलवंतानी त्याचें कौतुक केले आहे।

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.