मुंबई (जगदीश काशिकर) - विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसच्या दोन उमेदवारांसह महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास, यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा मंत्री सुनिल केदार, आ. अमर राजूरकर, आ. अभिजित वंजारी, डॉ. प्रज्ञा सातव, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा आदी उपस्थित होते.