भद्रावतीत कारगिल विजय दिवसा -प्रित्यर्थ शुरविरांसह , विर माता - पिता व विरपत्नीचा सत्कार ..!
भद्रावती (ता.प्र.) - दि. २६ जुलै २०२२ रोजी जय हिंद फाऊन्डेशन चंद्रपूरच्या स्थानिक शाखेच्या वतीने कारगिल विजय दिवसा- प्रित्यर्थ शुरविरांसह , विर माता -पिता व विरपत्नीचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते भारतमातेच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलीत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सामुहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. कारगिल विजय दिवसासाठी शहिद झालेल्या भारतमातेच्या शुरविरपुत्रांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्नरी कॅप्टन विलास देठे, तर प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक अजय मेश्राम, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को ) अधिकारी सुभेदार मेजर कृष्णराव साठवणे, जयहिंद फाऊन्डेशन चंद्रपूरचे अध्यक्ष माजी सैनिक विजय तेलरांधे, बेलोराच्या अरविंदो प्रा.लि. चे चिफ इंजिनिअर सैय्यद हक, इंजिनिअर विनोद मत्ते, १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युध्दात सहभागी झालेले तसेच भद्रावतीचे भुषण माजी सैनिक पांडूरंग हेमके, रामचंद्र नवराते व विश्वनाथ पाटणकर, कारगिल विजय ऑपरेशन मध्ये सहभागी झालेले अजीत राम आणि नमोद रामटेके, विरमाता लिलाबाई रामदास बावणे, विरपत्नी रजनी विनोद बावणे, विरपत्नी मनिषा विवेक डोंगरे, ओ.एफ. चांदा एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे सुमित राठोड व जयहिंद फाऊन्डेशनचे सचिव माजी सैनिक संतोष आक्केवार उपस्थित होते. याप्रसंगी माजी सैनिक पांडूरंग हेमके, रामचंद्र नवराते आणि विश्वनाथ पाटणकर, एसबीआय च्या स्थानिक शाखेचे व्यस्थापक अजय मेश्राम, विरपत्नी रजनी विनोद बावणे, विरपत्नी मनिषा विवेक डोंगरे व सुमित राठोड यांनी समयोचित मार्गदर्शन केले.जयहिंद फाऊन्डेश चंद्रपूरचे अध्यक्ष माजी सैनिक विजय तेलरांधे यांनी माजी सैनिकांच्या परीवारीक अडीअडचणी सोडविण्यासाठी व त्यांचा शासन दरबारी पाठपुरावा व्हावा . या द्दष्टीने जयहिंद फाऊन्डेशन सोबत प्रत्येक माजी सैनिकांच्या परीवारांनी असले पाहीजे असे सांगितले. माजी सैनिक सामाजिक दायीत्वपूर्ण करण्यासाठी नेहमी तयार आहे. जय हिंद फाऊन्डेशच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या परीवारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या उपक्रमांत सर्वांनी सहभाग दर्शवावा. असे आवाहन विजय तेलरांधे यांनी या प्रसंगी उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन जय हिंद फाऊन्डेशनचे अध्यक्ष माजी सैनिक विजय तेलरांधे व आभार प्रदर्शन माजी सैनिक अरुण मत्ते यांनी केले.या कार्यक्रमात सेवारत सैनिक हर्षल बानगे ,माजी सैनिक अरुण खापणे, अरुण मत्ते, प्रमोद गावंडे, नामदेव मांडवकर,सुरेश नाकाडे,नमोद रामटेके, अजीत राम, सुरेश मस्के, दिलीप लेडांगे, विठ्ठल मत्ते, विरपत्नी संगिता मोहितकर व विरपत्नी कमल मत्ते यांच्यासह उषा बावणे, दर्शना तेलरांधे, तेजस्वीनी तेलरांधे व कुसुम तेलरांधे उपस्थित होत्या, कार्यक्रम आयोजनासाठी मधूकर तेलरांधे सुरज खंगार, गजानन नवराते, नितेश बानोत, व्यंकटेश जंगापल्ली अतिश डोंगरे व सागर नाकाडे यांनी महात्वपूर्ण सहकार्य केले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.