पाऊसामुळे घराचे नुकसान, संकटात सापडलेल्या परीवारांना आर्थिक सहाय्य मिळावे – मोहीत डंगोरे
बल्लारपूर (का.प्र.) - सतत झालेल्या मुसळधार पाऊसाने सर्वत्र हाहाकार गाजवला आहे. प्रत्येक राज्यात जिल्हात मुसळधार पाऊसामुळे अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. बल्लारपूर शहरात देखील अनेक परिवारांच्या घरांच्या भिंती कोसळलेल्या आहे. अनेक जन जखमी देखील झालेले आहे. बल्लारपूर शहरातील डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, कन्नमवार वॉर्ड परिसरात घरे कोसळले असून परिवारांचे मोठे नुकसान झाले आहे. काही लोकांना स्थलांतर देखील करण्याची गरज भासत आहे. त्यामुळे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, चंद्रपूर अध्यक्ष साई सरकार ग्रुप व मोहीत डंगोरे यांनी बल्लारपूर तहसील कर्मचाऱ्या सोबत प्रभाग क्र. २, इथे स्वत: राहून पंचनामे केले. घरे पडलेल्या परिवारांना आर्थिक सहाय्य लवकरात लवकर देण्यात यावे ही विनंती तहसीलदार साहेब यांच्या कडे केली आहे.