बल्लारपुर (का.प्र.) - बामणी टी पॉइंट,बल्लारपूर येथे राजुरा पुलावर पुर आल्यामुळे अडकुन असलेल्या विविध राज्यातील ट्रक ड्रायव्हर यांना माणुसकीची जाणिव ठेऊन अश्या विकट परिस्थितीत मा.श्री चंदनसिंह चंदेल (माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनात व हस्ते शुक्रवार ला अन्नदान भाजपा कार्यकर्ता यांच्या वतीने करण्यात आले.आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेलं मार्गदर्शन आणि सुचना याला अनुसरून भारतीय जनता पार्टी चा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रितीने पुर पिडीत किंवा पुरामुळे विकट परिस्थितीत सापडलेल्या प्रत्येक व्यक्ती पर्यंत माणुसकीच्या नात्याने कार्यरत आहे. मागील दोन दिवसापासून हा माणुसकीचा उपक्रम चालु असुन भविष्यात परिस्थिती सामान्य होत पर्यंत दटुन राहण्याचा ठाम विश्वास यावेळी भाजपा नेते आणि कार्यकर्ते यांनी दर्शविला आहे.या प्रसंगी माजी जि.प.सदस्य ॲड.हरिश गेडाम,नामदेव भोयर,प्रकाश मुडपल्लीवार, अनिल टिपले(माजी सरपंच), रमेश मोहीतकर, रुमदेव डेरकर, देवेंद्र वाटकर, विठोबा गोंधळी, दिपक साळवे,चंदन चौधरी,राजू भोयर, विशाल इदनुरी, दशरथ राऊत, रमेश सोनवणे, वासुदेव पिंपळकर व अन्य कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.श्री चंदनसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनात व हस्ते अन्नदान..!
byChandikaexpress
-
0