पाच कलावंतांना करणार 'दादा कोंडके' पुरस्कारने सन्मानित!

मुंबईत महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासाचा भव्य लोकरंग महोत्सव ! पाच कलावंतांना करणार 'दादा कोंडके' पुरस्कारने सन्मानित!

मुंबई (जगदीश काशिकर) - मुंबईत सांस्कृतिक चळवळीत अग्रेसर असलेल्या "महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान" न्यासाचा २२ वा लोकमहोत्सव दि.४ ते ६ जुलै रोजी परेलच्या दामोदर नाट्यगृहात संपन्न होत आहे. महोत्सवाच्या सांगता प्रसंगी ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या सुषमा शिरोमणि,गितकार किशोर कदम (सौमित्र ), शाहीर नंदेश उमप,दिग्दर्शक प्रविण तरडे,अभिनेते प्रसाद ओक या त्यात्या क्षेत्रात दिग्गज ठरलेल्यांना "शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्काराने " सन्मानित करण्यात येणर आहे. लोकमहोत्सवाचा आरंभ ४जुलै रोजी डॉक्टर राजेंद्र जाधव लिखित "लावण्य जलसा'या बहारदार लावण्यांनी होणार आहे.त्यामध्ये अभिनेत्री वर्षा संगमनेर, विजया पालव,अमिता कदम, उर्मिता डेव्हिड या नृत्यांगना आपली आदाकारा सादर करुन लोकमहोत्सवाची रंजकता वाढवतील. ५ जुलै रोजी  प्रतिथयश संगीतकार देवदत्त साबळे यांच्या ५० वर्षातील गाजलेल्या लोकप्रिय गाण्याचा संगीतमयी मागोवा घेण्यात येईल!

या महोत्सवाची सांगता ६ तारखेला शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सोहळ्याने होईल.अभिनेता पराग चौधरी दादा कोंडके यांचा अभिनय "सोंगाड्या " या कार्यक्रमाद्वारे पेश करुन शाहीर कोंडके यांच्या स्मृतींना उजाळा देतील. मराठी विनोदी चित्रपटाचे प्रेरणास्थान ठरलेल्या दादा कोंडगे यांचा स्मृती सोहळा दरवर्षी त्यांच्या भगिनी लिलाबाई मोरे यांच्या प्ररणेने संपन्न होतो आहे.शाहीर दादा कोंडके यांचै भाचे पदमाकर मोरे आणि सौ.माणिक पदमाकर मोरे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. लोकमहोत्सवाला विविध स्तरातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.कार्यक्रम अत्याधुनिक पध्दतीने पेशकरुन तो अधिकाधिक दिमाखदार करण्यावर भर रहाणार असून कार्यक्रम मोफत आहे. तेव्हा रसिकांना ही एकप्रकारे संगीत मेजवानी ठरावी,असे न्यासाचे कार्यकारी संचालक संतोष परब यांनी म्हटले आहे. 

संपूर्ण लोकमहोत्सवाची संकल्पना सायली परब यांची असून संगीत संयोजक म्हणून संगीतकार मनोहर गोलांबरे सांभाळत आहेत. नैपथ्य व प्रकाश योजना सुनिल देवळेकर, नृत्यदिग्दर्शन अमित घरात यांचे असून सर्वच कलाकार हा सोहळा नेत्रदीपक ठरावा असा प्रयत्न करीत आहेत. संस्थेचे अध्यक्ष किसन जाधव आणि विश्वस्त अशोक सावंत, बाळा खोपडे - मानद विश्वस्त, डॉ. सुनील हळूरकर -विश्वस्त, राजू शेरवाडे-कलावंत प्रतिनिधी या सर्वांच्या प्रयत्नातून हा महोत्सव साकारला जात आहे. रात्रौ ८.३० ते ११.३० या कालावधीत पार पडणार्या या लोकमहोत्सवात कोविड १९ बाबत राज्य शासन व मुंबई महानगर पालिकेने लागू केलेल्या सर्व निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".