बल्लारपू (का.प्र.) - बल्लारपूर येथील मानवाधिकार साहयता संघ शाखा बल्लारपूर चे तालुका अध्यक्ष व बल्लारपुर पोलीस स्टेशन येथील पोलीस मित्र रोहन कळसकर यांनी गेल्या काही दिवसापुर्वी विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथील मुकुंदा पाझारे ते माधवराव पोटे यांच्या घरा कडे जात रोडवरील असलेले वाॅटर सफ्लाय चे गड्डे बुजविण्या करिता बल्लारपुर नगर परिषद चे मुख्याधिकारी मा. विजय देवळीकर, उपमुख्यधिकारी मा.जयवंत काटकर आणि सिविल इंजिनिअर संजय बोढे यांना कॉल व व्हाट्सअप मेसेज च्या माध्यमातून मागणी केली होती. बल्लारपुर नगर परिषद चे मुख्याधिकारी यांनी दिनांक 30/06/22 ला मानवाधिकार साहयता संघ शाखा बल्लारपूर चे तालुका अध्यक्ष व पोलीस स्टेशन बल्लारपुर पोलीस मित्र रोहन कळसकर यांच्या मागणी ची तत्काळ दखल घेऊन या मागणी यश मिळवुन देण्या करिता सहकार्य केले व ते काम पुर्णपणे यशस्वी झाले आहे.
