नचिकेत लाखे ला ७.५० लक्ष रू. निधीची मदत..!

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत..नचिकेत लाखे या विद्यार्थ्‍याच्‍या वैद्यकिय शिक्षणासाठी सीएसआर च्‍या माध्‍यमातुन ७.५० लक्ष रू. निधीची मदत..

बल्लारपुर (का.प्र.) - विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूरच्‍या गरीब विद्यार्थ्‍याला मदतीचा हात दिला आहे. नचिकेत विजय लाखे या चंद्रपूरातील नगीनाबाग परिसरात विद्यार्थ्‍याला एमबीबीएस अभ्‍यासक्रमाचे प्रवेश शुल्‍क, पुस्‍तकांसाठी पैसे व नीट परिक्षेसाठी लागणारी मदत आ. मुनगंटीवार यांनी सीएसआर निधीतुन उपलब्‍ध करण्‍यासाठी केलेल्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले असून यासर्व आवश्‍यक बाबींसाठी ७.५० लक्ष रू. रक्‍कम या विद्यार्थ्‍याचे पुर्ण शिक्षण होईपर्यंत मिळणार आहे. विविध विकासकामांसाठी सीएसआरच्‍या माध्‍यमातुन निधी उपलब्‍ध करण्‍यासाठी लौकीकप्राप्‍त असलेल्‍या आ. मुनगंटीवार यांनी असंख्‍य रूग्‍णांना वैद्यकिय मदत मिळवून देण्‍यासाठी स्‍वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. नचिकेत लाखे या गरीब विद्यार्थ्‍याच्‍या वैद्यकिय शिक्षणासाठी मदत मिळवून देत आ. मुनगंटीवार यांनी या विद्यार्थ्‍यांचे भविष्‍य उज्‍वल होण्‍यासाठी पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्‍याच्‍या पालकांनी आ. मुनगंटीवार यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".