मुंबई (जगदीश काशिकर) - कै. ना. श्री. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचे स्मरण यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी केले. त्यांनी केलेल्या जलसिंचन, पाणी अडवा पाणी जिरवा सारख्या योजना, औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील कामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत झाल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री. नाना पटोले माजी गृह राज्यमंत्री आ. श्री. रणजीत पाटील, आ. राजेश राठोड, आ. इंद्रनील नाईक, राजू नाईक, डॉ. राम चव्हाण, महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी, उपसभापती कार्यालय खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर आणि विधी मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. कृषी दिनाच्या निमित्ताने राज्यातील शेतकरी वर्गाला हार्दिक शुभेच्छा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री ना. कै. वसंतराव नाईक यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त अभिवादन..!
byChandikaexpress
-
0
