बल्लारपुर (का.प्र.) - श्री.अनिल कुमार शिंपी (सिने दिग्दर्शक मुंबई)यांच्या संकल्पनेतून आणि अथक परिश्रमातून नागपूर येथे पहिला विदर्भ चित्रपट मोहस्तव दिनांक 11/12/13 ऑगस्ट २०२२ रोजी डॉ वसंतराव देशपांडे सभागृह व साऊथ जोन कल्चलर सभागृह येथे आयोजित होत आहे. गेल्या दोन वर्षापासून या फेस्टिवल करिता अनिल शिंपी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत, पण करोना च्या महामारी व राजकीय घडामोडी मुळे सदर फेस्टिवल घेता आला नाही. तसेच या आधी मराठवाडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जुहू येथील मेयर हाऊस येथे आयोजित करण्यात आला होता ,यामध्ये जवळपास १२० निर्मिती संस्थानीं सहभाग घेतला होता... आता नागपूर येथे होणाऱ्या विदर्भ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सर्व भाषेतील चित्रपट प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विदर्भ चित्रपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजक श्री.अनिल शिंपी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रा बरोबर इतर राज्यातील कलाकारानां केले आहे. तसेच
अतिशय सुसूत्र अश्या पद्धतीने ह्या फेस्टिवल चे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी भाषेतील शॉर्ट फिल्म, चित्रपट, या बरोबरीने हिंदी, गुजराती, इंग्रजी भाषेतील चित्रपट ,शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी व्हिडीओ अल्बम जाहिरात फिल्म चित्रपट निर्माते व सर्व कलाकारांनी सहभागी व्हावे त्यामुळे सदर फेस्टिवल चे रूप खऱ्या अर्थाने बदलेल. सर्व भाषेतील चित्रपट कलाकार, सिनेतंत्रज्ञ, विशेष मान्यवरांच्या उपस्थित हा मोहत्सव संपन्न होईल. आपल्या भाषे सोबतच इतर भाषेतील कलाक्रुती समाविष्ट व्हाव्यात व त्यांचे विचार, संकल्पना आपल्यास बघता याव्यात.. आपआपल्या कला संस्कृतीचे आदानप्रदान होऊन कलेची जाणिव प्रगल्भ होईल व त्याच बरोबर आपल्या विभागीय पर्यटनाला वाव मिळेल हा मुख्य हेतू ह्या मुळे साध्य होईल असे अनिल शिंपी यांनी सांगितले...
ह्या फेस्टिवल चे हे पहिले वर्ष असून फेस्टिवल ला भरघोस असा प्रतिसाद मिळावा असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विफ चे पदाधिकारी कमिटी सद्स्य श्री गुलाम कलिम शेख, विशाल फुले, डॉ अनिल वाघ ,अशोक पाटील,मुक्तार शेख, विनोद डावरे, अनिशा शेख, कीर्ती पत्राले,अनिल कुरी,नितीन बनसोड, प्रफुल्ल अगवणे,तसेच सर्व मित्र परिवार व संपूर्ण टीमचे कार्यक्रमाला सहकार्य लाभणार आहे, त्याच बरोबर विदर्भ आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवा नंतर कोकण गोवा तसेच इतर राज्यात सुद्धा आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सव भरवणार आहोत, त्यामुळे त्या त्या विभागातील होतकरू स्वतंत्र निर्माते, दिग्दर्शक ,कलाकार व कलाप्रेमींना ही व्यासपीठ मिळेल, प्रोत्साहन मिळेल,अशी आमची प्रामाणिक भूमिका असणार आहे, फेस्टिवल स्पर्धक, फेस्टिवल मित्र ,फेस्टिवल प्रायोजक म्हणून इच्छुक असणाऱ्यानी संपर्क करावे असे ही ह्या फेस्टिवल चे सर्वेसर्वा अनिल कुमार शिंपी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, संपर्क व्हाट्सएप क्रमांकावर साधावा 9322146937
