मुंबई (जगदीश काशिकर) - मुंबई: थोर राष्ट्रीय नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी आज (दिनांक २३ जुलै, २०२२) पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. या प्रसंगी महानगरपालिका उप सचिव श्री. किरण गायकवाड, महापौरांचे स्वीय सचिव श्रीमती भाग्यश्री नलावडे उपस्थित होत्या.