आमदार गणपत गायकवाड आणि पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या विद्यमाने चाकरमान्यांना कोकणात घेवून गेल्या १२ बसेस.!

कल्याण (जगदीश काशिकर) - कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार श्री. गणपत गायकवाड तसेच भाजपा पुर्व मंडळ अध्यक्ष श्री. संजय बाबुराव मोरे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रात्री प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणातून कोकणासाठी १२ विशेष बसेस सोडण्यात आल्या. ५० टक्के प्रवासी भाडे घेऊन कोंकणातील आपल्या गावी गौरी - गणपती सण साजरा करण्यासाठी चाकरमान्यांना या बसेस मधून सन्मानपूर्वक रवाना करण्यात आले.गेल्या ८ वर्षांची परंपरा अखंडीत पणे चालू ठेवत या बसेस कोकणाकडे मार्गस्त करतांना या बसेसला आमदार पुत्र वैभव गायकवाड तसेच प्रभाग ५ ड च्या सहाय्यक आयुक्त सौ . सविता हिले यांनी झेंडा दाखवला.

सुमारे ६५० चाकरमाणी प्रवासी घेउन निघालेल्या या बसेसच्या ताफ्यातील प्रत्येक वाहन चालक - वाहक यांचा या वेळी उचित सत्कार करण्यात आला तसेच आयोजकांच्या वतीने या प्रवासात सहभागी झालेल्या कुटूंब प्रमुखांचा गणरायाच्या दहा दिवस पुजेसाठी आवश्यक असलेले पुजेचे साहित्य तसेच आरती संग्रह देउन सन्मानित करण्यात आले. या समयी आमदार पुत्र वैभव गायकवाड यांनी सर्व प्रवाश्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तर आयोजक संजय मोरे यांनी सांगितले की गेली सातत्याने ८ वर्षे हा उपक्रम राबवला जात असून या चाकरमान्यांना आवश्यतेनुसार परतीच्या प्रवासाचीही सोय केली जाणार आहे.या समयी माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के तसेच श्रीमती वंदना मोरे, विजय उपाध्याय, नितेश म्हात्रे, गुड्डू खान, नितिन शिंदे, रवी हराळे, सदानंद शिंदे, मनोज पांडे, सौ.निलिमा महाजन, सौ.शैला वाणी,अविनाश शिरकर, नितिन मोडवे, राजु अंकुश, संजय जयंत मोरे यांचेसह भारतीय जनता पक्षाचे महिला व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन संदिप तांबे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.