शिंदे विद्यालयात गणवेश वितरण ..!

भद्रावती (ता.प्र.) - यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमार्फत गणवेश वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शिस्त व एकसंघता दिसण्यासाठी गणवेशाचे महत्त्व स्पष्ट केले.यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वर्ग आठवीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी स्वतःकडून विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करून , विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष  प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे, पर्यवेक्षक श्री ताजने , प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार व्यासपीठावर उपस्थित होते.

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना  पुस्तके व गणवेश वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्री. ए. एम. देशमुख यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री लांबट सर, कोल्हे सर,पाटील सर, श्री आसुटकर सर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".