भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारे नागपूर विभागाचे नवनियुक्त शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार सुधाकर अडबाले यांनी "जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे" असे सांगितले.
सन्मान कर्तुत्ववंतांचा हा सत्कार कार्यक्रम भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, सत्कारमूर्ती आमदार सुधाकर अडबाले, विशेष अतिथी प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे , डॉ. अनिल शिंदे , सुधाकर खनके , प्राचार्य डॉ. एल एस लडके हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कार्तिक शिंदे यांनी केले. सत्काराला उत्तर देताना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्या मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सावध असले पाहिजे व आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. "जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे . तो कर्मचाऱ्यांना प्राप्त होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही "असे मार्गदर्शन केले . शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराला विरोध केला पाहिजे. कोणी पैशाची मागणी केल्यास मला कळवावे असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. विवेक शिंदे यांनी सुधाकर अडबाले हे सर्वसामान्य शिक्षकांचे खऱ्या अर्थाने आमदार आहेत , त्यांना शिक्षण क्षेत्रातील समस्यांची जाण आहे , ते आपले प्रश्न निश्चितच सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला .
या कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे निवडून आलेले सिनेट सदस्य तसेच विविध प्राधिकरणातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ. सुधीर मोते व प्रा.उज्वला वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. जयंत वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला भद्रावतीतील मान्यवर, प्राध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.