भद्रावती (ता.प्र.) -भद्रावती शिक्षण संस्था ,भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिंचोर्डी ,भद्रावती येथे मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपन्न करण्यात आली .यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे सर यांनी मार्गदर्शन करताना "शारीरिक व मानसिक विकासात, दैनंदिन जीवनात खेळाला प्राधान्य द्यावे "असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. सुधीर मोते यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर ढोक यांनी केले. तर आभार प्रदर्शन क्रीडाशिक्षक श्री रमेश चव्हाण यांनी केले.यावेळी क्रीडा साहित्य प्रकारातील हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी यांच्या मॅचेस घेण्यात आल्या. यावेळी खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक ,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत या कार्यक्रमाला पटांगणात उपस्थित होते.