भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती तालुक्यातील पिंपरबोडी येथे काही वर्षांपूर्वी एकाने मित्राच्या नातेवाईकाची हत्या केली होती त्या घटनेची सल मनात कायम ठेवून त्या हत्येचा बदला केव्हा तरी घेऊ या विचारातून काल 28 ऑगस्ट ला भद्रावती येथील पिंपरबोडीत सायंकाळी 7:00 वाजताच्या सुमारास सूरज चेट्टी वय - 35 या व्यक्तीवर रमेश शेट्टी यांनी धारदार शस्त्राने वार केले या हल्ल्यात सुरज चेट्टी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी रविवारी 28 तारखेला राज्याचे विशेष महापोलीस निरीक्षक छेरिंग दोरजे हें गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी चंद्रपुर व वरोरा शहराला भेटी दिल्या. सदर व्यक्तीच्या हत्येपूर्वी दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता विशेष बाब म्हणजे सूरज ने मागील काही वर्षांपूर्वी रमेश चेट्टी च्या नातेवाईकाची हत्या केली होती व या हत्येचा वचपा म्हणुन रमेश ने सूरज ची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे वृत्त आहे सदर घटनेची माहीती मिळताच भद्रावती पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे पाठविण्यात आला असून पुढील प्रकरणाचा तपास भद्रावती पोलिस करीत आहे.