पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद .. वन व सांस्कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलीत...!
बल्लारपुर (का. प्र.) - चंद्रपूर जिल्हयातील मुल येथील शासकीय कृषी महाविद्याच्या इमारत बांधकामासाठी ३५ कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला असून यासाठी जुलै २०२२ च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. वन व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.वन व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक १० मार्च २०२२ रोजी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करत मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी तसेच वेतनेतर अनुदानासाठी निधी मंजूर व्हावा अशी मागणी केली होती. त्यानुसार दिनांक १६ मार्च २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ६४.५९ कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर निधी पैकी पहिला टप्प्यात ३५ कोटी रू. निधीची जुलै २०२२ च्या पुरवणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातुन तरतूद करण्यात आली आहे.
श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ३५ कोटी रू. निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातुन सदर कृषी महाविद्यालयाच्या इमारत गती प्राप्त होणार आहे. हे कृषी महाविद्यालय माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या भूमीत स्थापित असून कृषी शिक्षण व संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये हे कृषी महाविद्यालय मैलाचा दगड ठरावे यादृष्टीने आपण प्रयत्नांची शर्थ करणार आहोत असे श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.