सांस्‍कृतीक कार्यमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्‍या घोषणेला प्रतिसाद..!

वंदे मातरम् या शब्‍दाने संभाषणाला सुरूवात करण्‍याची शपथ भाजपा जैन प्रकोष्‍ठने घेतली..!

बल्लारपुर (का.प्र.) - वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. भारतीय स्‍वातंत्र्य लढयात ऊर्जा चेतविण्‍याचे कार्य या राष्‍ट्रगानाने केले आहे. हा केवळ एक शब्‍द नसून भारतीयांच्‍या भारतमातेविषयीच्‍या भावनांचे प्रतिक आहे. सन २०२२ हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृतमहोत्‍सवी वर्ष आहे. अमृतमहोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापुढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरूवात करतील अशी घोषणा राज्‍याचे सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

या घोषणेला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे जैन प्रकोष्‍ठ चंद्रपूरच्‍या वतीने हॅलो या शब्‍दाऐवजी वंदे मातरम् या शब्‍दांचा उपयोग करून संभाषणाला सुरूवात करण्‍यात येणार अशी शपथ श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत घेतली. यावेळी सचिव महानगर मनोज सिंघवी, भाजपा जैन प्रकोष्‍ठचे महाराष्‍ट्र सचिव भाजपा जैन प्रकोष्‍ठ निर्भय कटारिया, महाराष्‍ट्र उपाध्‍यक्ष भाजपा जैन प्रकोष्‍ठ महेंद्र मंडलेचा, चंद्रपूर जिल्‍हाध्‍यक्ष भाजपा जैन प्रकोष्‍ठ हेमंतराज सिंघवी, विदर्भ महिला प्रमुख भाजपा जैन प्रकोष्‍ठ सपना कटारीया, विदर्भ महिला कार्यकारीणी भाजपा जैन प्रकोष्‍ठ दर्शना मोदी, राजेश मुथा, महिला चंद्रपूर जिल्‍हाध्‍यक्ष भाजपा जैन प्रकोष्‍ठ अर्चना मुनोत, महिला महानगर अध्‍यक्ष भाजपा जैन प्रकोष्‍ठ वंदना गोलेच्‍छा, महानगर सचिव अनिल बोथरा, महानगर उपाध्‍यक्ष विशाल मुथा, महानगर सहसचिव सुनिल पंचोली, महानगर कार्यकारीणी सदस्‍य पलाश सिंघवी, आनंद तालेरा, चेतन झांबड, रूपेश दुग्‍गड, पियुष दुग्‍गड, शशांक धानुका, साकेत धानुका आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.