भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शहरातील काही वर्षांपूर्वी एकाने मित्राच्या नातेवाईकांची हत्या केली होती मात्र अनेक वर्षांनी हा वाद पुन्हा उफाळत भद्रावती येथील पिपरबोडी गावात हत्येचा थरार घडला.विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी रविवार 28 ऑगस्टला विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे हे चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सवाचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्याच रात्री रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास 30 वर्षीय सूरज शेट्टी या युवकांवर रमेश शेट्टी याने धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सूरज रक्तबंबाळ होऊन जागीच मृत्यू झाला. हत्ये आधी दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता, घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती घटनास्थळी दाखल झाले.सुरजने काही वर्षांपूर्वी संजय शेट्टी यांच्या नातेवाईकांची हत्या केली होती, त्याचा वचपा काढण्यासाठी संजय ने सूरज ची हत्या केली असावी अशी चर्चा आहे .घटनेची तक्रार दाखल झाल्यावर आरोपी पिपरबोडी निवासी रंगनाथ व्यंकय्या कोरवन (48), संजय राजू चेट्टी (30) यास अटक करण्यात आली.आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.