मुंबई (जगदीश काशिकर) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धाकटा भाऊ प्रल्हाद दामोदरदास मोदी यांना ऑनररी बोगस पीएचडी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हस्ते असंख्य जणांना बोगस पीएचडी वाटण्यात आल्या. अशाच प्रकारे सिनेअभिनेता गोविंदा, राजपाल यादव यांनाही बोगस पीएचडी देण्यात आल्या. अशा पद्धतीने महाराष्ट्रात बोगस पीएचडी विकण्याचे जणू पेवच फुटले आहे, मात्र राज्यपाल (कुलपती ) भगतसिंह कोश्यारी व युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे लाचखोर अधिकारी मूग गिळून गप्प आहेत.राजभवनात बोगस पीएचडी वाटण्याचा कार्यक्रम थाटामाटात साजरा करण्यात आला, याचा भांडाफोड 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने केला. त्यानंतर बोगस पीएचडीचे रॅकेट चालवणारा मधू क्रिशन (Madhu Krishan) याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबर येऊन ब्रेकफास्ट केला. त्यालाही राज्यपालांनी पुरस्कार देऊन गौरविले.या सर्व बेकायदेशीर गोष्टींना राज्यपाल कोश्यारी यांचे सचिव उल्हास मुणगेकर या भामट्याचा आशीर्वाद आहे, हेही 'स्प्राऊट्स'ने पुराव्यानिशी सिद्ध केले. तसेच राजभवनात बेकायदेशीरपणे बसलेला मुणगेकर हा राजभवनातील 'सचिन वाझे' आहे. त्यामुळे याची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी, अशी कायदेशीर नोटीसही पाठवली. मात्र त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
भारतासह महाराष्ट्राच्या गल्लीबोळात सध्या बोगस ऑनररी पीएचडी विकण्यात येतात. गल्लीबोळातल्या संस्था या कधी बोगस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या मदतीने तर कधी स्वतःच एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठा सोहळा आयोजित करतात व तेथे त्यांना बोगस पीएचडी देतात.एखाद्या सेलेब्रिटीला फुकटात बोगस पीएचडी द्यायची, त्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सकडून पैसे उकळायचे व त्यांना पीएचडी विकायची, सोबत वातावरण निर्माण करण्यासाठी फटाकड्या मॉडेल्सना पैसे देवून बोलवायचे. एखाद्या व्यक्तीला कार्यक्रमाला यायला वेळ नसेल तर त्याला हे प्रमाणपत्र कुरिअरने पाठवायचे, ही त्यांची मोडस ऑपरेंडी.भारतात स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु श्री. श्री. रवीशंकर तर मोटिव्हेटर विवेक बिंद्रा हेही याच पद्धतीने बोगस पीएचडी घेवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. रायगड जिल्ह्यातही एका भामट्याने अशाच प्रकारे एका थोर आध्यात्मिक गुरूला बँकॉक येथे नेवून बोगस युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची पीएचडी दिली.वाचकांच्या आग्रहास्तव पुन्हा या बोगस विद्यापीठ व बेकायदेशीरपणे पीएचडी वाटप करणाऱ्या संस्थांची यादी प्रसिद्ध करीत आहोत:
ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, श्रीलंका, अमेरिका हवाई विद्यापीठ आणि आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा, युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ, अमेरिका, साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी, अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए, झोराष्ट्रीयन युनिव्हर्सिटी, सॉर्बोन युनिव्हर्सिटी, फ्रान्स,महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन - (NGO), एम्पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट - (NGO), नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार अकादमी - NGO, डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस - NGO, मानव भारती विद्यापीठ (MBU), हिमाचल प्रदेश, मानव भारती विद्यापीठ, सोलन, विनायक मिशन्स, सिंघानिया, अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस, छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर, अमेरिकन हेरिटेज युनिव्हर्सिटी ऑफ साऊथन कॅलिफोर्निया (AHUSC), पीस युनिव्हर्सिटी, ट्रिनिटी वर्ल्ड युनिव्हर्सिटी, युके, सेंट मदर टेरेसा युनिव्हर्सिटी, अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल युनिव्हर्सिटी, जीवा थिऑलॉजिकल ओपन युनिव्हर्सिटी, वर्ल्ड पीस इन्स्टिटयूट ऑफ युनायटेड नेशन्स, ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी, भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन, नॅशनल ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी, बल्सब्रिज युनिव्हर्सिटी, श्री दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड फिल्म फॉउंडेशन (एनजीओ), इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूमॅनिटी हेल्थ सायन्स अँड पीस, यूएसए, हर्षल युनिव्हर्सिटी, इंटरनॅशनल इंटर्नशिप युनिव्हर्सिटी.