बल्लारपुर (का.प्र.) - यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक पालक संघ,भद्रावती शिक्षण संस्था द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे नुकतीच शिक्षक पालक संघाची सभा आयोजित करण्यात आली. या सभेत शिक्षक पालक संस्थापन करणे व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे या संबंधाने ही सभा आयोजित केली होती . यशवंतराव शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे शैक्षणिक सत्र 2022 - 23 करिता पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली . या सभेचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे होते. पर्यवेक्षक ताजने सर यांनी शासन परिपत्रकानुसार पालक शिक्षक संघाची आवश्यकता व महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षाच्या परवानगीने मागील शैक्षणिक सत्राची कार्यकारिणी बरखास्त करून , नवीन कार्यकारणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.सहाय्यक शिक्षक श्री पाटील सरांनी सर्व नियुक्त सदस्यांचा परिचय करून दिला. या सभेत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून ठराव संमत करण्यात आले . यावेळी अध्यक्ष महोदयांनी उपस्थित सर्व पालकांना आपल्या पाल्यांच्या अभ्यासाकडे व उपस्थितीकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले . उपस्थित सर्व शिक्षक वृंद व पालकांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या सभेचे सूत्रसंचालन श्री ए.एम. देशमुख सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री लांबट सर यांनी केले.