भद्रावती (ता.प्र.) - राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षक भारतीने जुन्या पेन्शनसाठी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.शिक्षक भारती संघटनेच्या सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्य यांनी समन्वय समितीच्या स्थानिक पातळीवरील व्यक्तीशी संपर्क करून आंदोलनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे,जिल्हाध्यक्ष भास्कर बावणकर,ज्ञानेश हटवार,बजरंग जेणेकर,महेश भगत,जिल्हा कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे,जब्बार शेख,दादाजी झाडे,कार्यवाह राकेश पायताडे,रामदास कामडी,नंदकिशोर शेरकी,रावण शेरकुरे,रॉबिन करमरकर, निर्मला सोनवणे, रंजना तडस आदींनी केले आहे.या बाईक रॅलीत जिल्हा कार्यकारणी, तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारणी आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे सर्व सदस्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून ही रॅली यशस्वी करावी.पेन्शनचा प्रश्न सोडविण्यासाठी गेली अनेक वर्षे विविध आंदोलने करण्यात येत आहे. काही राज्यांत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे.महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी हे आंदोलन आहे. या आंदोलनात शिक्षक भारतीच्या सभासदांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जुन्या पेन्शनसाठी होणाऱ्या राज्यव्यापी बाईक रॅलीत शिक्षक भारती सहभागी झाले..!
byChandikaexpress
-
0