धनगर समाजाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा..!

धनगर समाजाला एस टी आरक्षण नाही तर आरक्षनाची अमलबजावणी करायची आहे - डॉ. मंगेश गुलवाडे

भद्रावती (ता.प्र) - दिनांक 18 सप्टेंबर 2022 ला आय एम ए हॉल चंद्रपूर येथे धनगर जमात मंडळ चंद्रपूर व धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाज प्रबोधन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा यशस्वीरित्या पार पडला. सन 2022 मध्ये 10 वीच्या परीक्षेत 85 टक्के पेक्षा जास्त गुण,12 वी परीक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण व कला, क्रीडा, साहीत्य, NEET, IIT या विषयात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन 50 विधार्थींचा गौरव मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा धनगर जमात मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे उपस्थित होते.याप्रसंगी धनवर - धनगड धनगरच आहे आमची मागणी एस टी आरक्षण ची नाही तर आरक्षनाची अमलबजावणी करा ही मागणी आहे असे अध्यक्षीय भाषणातून डॉ गुलवाडे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.डॉ.अर्चना गजानन मस्के वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ यांनी केले.विशेष अतिथी मान. सुधीरभाऊ घुरडे, राष्ट्रिय महामंत्री, सदस्य JBCCI COAL INDIA, मान अनिलकुमार ढोले राज्याध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर यांची होती. संतोष जिल्लेवार, डॉ.तुषार मारलावार, विजय कोरेवार, विवेक तास्के , प्रा.संजय बोधे, पांडुरंग पांडीले, अजय मेकलवार, डॉ गजानन मस्के, गजानन शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास उराडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गोंडे व धर्माजी गावंडे यांनी केले. हेमंत ढोले यांनी आभार मानले. पाहुण्यांचे स्वागत अनुसया चिडे यांच्या मधुर आवाजाच्या स्वागत गीताने झाली. यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शनपर प्रबोधनातून समाजातील विविध विषयांवर चिंतन कथन करण्यात आले .कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी डॉ यशवंत कन्नमवार, कैलास उराडे, हेमंत ढोले, सुनिल पोराटे, उत्तम रोकडे, महादेव गराड, पवन ढवळे, प्रवीण गिलबिले, रामकुमार अक्कापल्लीवार, विठ्ठल गोंडे, निलेश काळे, अंबर खानेकर, खेमदेव कन्नमवार, पुरुषोत्तम येडे , शिरीष उगे, गणेश चिडे, ज्योती दरेकर,ज्योती धवने, सुनंदा कन्नमवार , पुष्पा दरेकर, अनुसया चिडे, संध्या ढवळे, वनिता उराडे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.