निळकंठ राव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात स्टार्टअप योजनेचा एलईडी चित्ररथाचे आगमन.!

भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती येथे निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे स्टार्टअप योजनेचा जनजागृती करणारा एलईडी चित्ररथाचे आगमन झाले.या स्टार्टअप योजनेचे विभागीय समन्वयक श्री रुपेश तलवारे, आमरीन पठाण, सुवर्णा थेरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल एस लडके उपस्थित होते.याप्रसंगी स्टार्टअप योजनेचे विभागीय समन्वयक श्री रुपेश तलवारे यांनी राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता याबद्दल आपल्या प्रस्ताविकेतून स्पष्ट केले तसेच नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणणे उद्योगाचा विस्तार करणे उद्योगाच्या समस्यांवर मात करणे यावर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना समोर आणण्याची तसेच त्या संकल्पना उत्कृष्ट प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या सादरीकरणात अनुक्रमे 25000, 15 हजार व दहा हजार पुरस्कार देण्यात येईल या माध्यमातून विभागीय व राज्य स्तरावर सादरीकरणाची संधी उमेदवारांना मिळणार आहे अशी सखोल माहिती दिली व नवीन उद्योजक निर्माण होतील अशी आशा व्यक्त केली.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल एस लडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्टार्टअप व नाविन्यता प्रकल्पाबाबत व योजनेविषयी जनजागृती करून विद्यार्थ्यांना आपल्यातील नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.या कार्यक्रमाकरिता भद्रावती येथील यशवंतराव शिंदे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व एम सी वी सी विद्यालय कर्मवीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय प्रियदर्शनी आयटीआय चे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.याप्रसंगी स्टार्टअप योजनेच्या जनजागृती करणाऱ्या एलईडी चित्रकथाद्वारे चित्रफितीचे प्रदर्शन दाखवण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र बेदरे यांनी केले.याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे श्री चौधरी श्री घोडे श्री बेलगावकर प्रा डॉक्टर अपर्णा धोटे विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".