भद्रावती (ता. प्र.) - २४ सप्टेंबर, १९६९ या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाची स्थापना करण्यात आली. त्या दिवसाची आठवण म्हणून आजच्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात येतो. या योजनेची माहिती महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावी या उद्देशाने आजचा दिवस साजरा करण्यात येत आहे. या योजनेचे महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्तम घोसरे यांनी केले. यावेळी मंचावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. रमेश पारेलवार, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. गजानन खामनकर, समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.अमोल ठाकरे, इतिहास विभागप्रमुख डॉ. जयवंत काकडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मंचावरील सर्व अतिथींनी या दिवसाला अनुसरून उपयुक्त मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. ठाकरे, आभारप्रदर्शन डॉ.खामनकर, प्रास्ताविक डॉ.रमेश पारेलवार यांनी केले. प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात यावेळी डॉ. प्रकाश तितरे, प्रा. संगीता बांबोळे, डॉ. यशवंत घुमे, प्रा मोहीत सावे, डॉ.विजय टोंगे यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा..!
byChandikaexpress
-
0