भद्रावती (ता.प्र.) - भद्रावतीच्या नामवंत स्त्री रोगतज्ञ डॉ. प्रिया विवेक शिंदे यांची आंतरराष्ट्रीय सन्मानासाठी निवड होऊन त्यांचा शानदार कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.भद्रावती व परिसरातील ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आरोग्य संबंधी समुपदेशन व आरोग्य विषयक जाग्रृती शिबिर घेऊन विषेष कार्य केल्याबद्दल डॉ. प्रिया शिंदे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देवून गौरवान्वित करण्यात आले. ग्रामिण भागात विशेष करून स्त्रियांमध्ये होणारे विविध प्रकारचे कॅन्सर या संबंधी जागृती, निदान व उपचार या साठी केलेल्या भरीव कामाची दखल घेत 'suvach' या आंतररा्ट्रीय संस्थेने भद्रावती येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रिया विवेक शिंदे यांच्या कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी निवड केली . नुकताच जयपूर येथे एका दिमाखदार सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मेडल,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला.विशेष बाब म्हणजे अवघ्या महाराष्ट्र मधून फार कमी लोकांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली.डॉ.प्रिया शिंदे यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंब, सहकारी, गुरुजन व रूग्ण यांना दिले . या प्रसंगी आपण या पुढे सुद्धा ग्रामीण भागातील स्त्रीयांच्या आरोग्य विषयक समस्या व त्यावरील उपाययोजना संबंधी काम करत राहून आपले योगदान देत राहू असे नमूद केले.त्यांच्या या अभूतपुर्व यशाबद्दल भद्रावती व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व डॉक्टर असोसिएशन भद्रावती यांनी त्यांचे अभिनंदन केले.