भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती येथील रोटरी क्लब ने पूर पीडित तसेच गरजू लोकांना कपडे इतर आवश्यक वस्तू भेट दिल्या. भद्रावती नगरपालिकेतर्फे जन कल्याण सुविधा केंद्राची स्थापना मागच्या वर्षी करण्यात आली. रोटरी क्लब भद्रावती ने जीवनावश्यक व इतर साहित्य कपडे, जूते , पुस्तक, गादी, पलंग इत्यादी वस्तु सुविधा केंद्रात जमा करून गरजवंत लोकांना दिल्या. भद्रावती येथील सुविधा केंद्रात कपडे साईजवार कमी जास्त करण्यासाठी जैन मंदिर ट्रस्ट ने शिलाई मशिन भेट दिली आहे.गरजवंत व्यक्ती या ठिकाणी जमा झाले होते त्यांना रोटरी क्लब ने वस्तू भेट दिल्या. याप्रसंगी रोटरी चे अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद , सचिव अनिल धानोरकर, कोषाध्यक्ष सुधीर पोरधे, रोटरीचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. नागरिकांनी सुद्धा या सुविधा केंद्रात साहित्य जमा करून गरजू लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना मदत करावी असे रोटरी क्लबचे भद्रावतीचे सचिव अनिल धानोरकर यांनी आवाहन केले.